रायगड ः सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर एक चकार शब्द काढायचा नाही, विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. राष्ट्रवादी काँगे्रसवर 70 हजार कोटी
रायगड ः सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर एक चकार शब्द काढायचा नाही, विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. राष्ट्रवादी काँगे्रसवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, पण अजित पवार त्यांच्यासोबत सत्तेत गेल्यानंतर त्याविषयी चकार शब्द काढायचा नाही, हे सगळं थोतांड सुरु असल्याची टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. अलिबागमध्ये एका बँकेच्या कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ’राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस पक्षाचे नेते व्यासपीठावर बसले आहेत. ऐकेकाळी आम्ही विरोधक होतो. शेकापसोबत तर आमच्या मारामारी झाल्या आहेत. तरी आम्ही एका व्यासपीठावर येऊ शकलो. कारण, त्या ज्या मारामारी किंवा विरोध होता तो व्यक्तिगत नव्हता. सुडाचे राजकारण कधीच नव्हते. पण, आता सुडाचे राजकारण सुरु आहे, असे ठाकरे म्हणाले. शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री जगजाहीर होती. तशी बाळासाहेबांची आणि अंतुले साहेबांची मैत्री उघड होती. उघड पाठिंबा दिला होता. जिथे मते पटायचे नाहीत, तेथे मताला विरोध व्हायचं. आता वेगळे राजकारण सुरु आहे. जो विरोध आहे त्याला संपवायचे आणि त्याच्या मित्राला देखील संपवण्याचे राजकारण सुरु झाले आहे. सध्या मी मी पणा सुरु आहे, माझ्याशिवाय कोणीच नाही असा हेका सुरु आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. काल पंतप्रधान मोदी शिर्डीमध्ये आले होते. मला अपेक्षा होती की ते आरक्षणाविषयी काही बोलतील, कारण हा त्यांच्या अखत्यारित येणारा प्रश्न आहे. पण, ज्वलंत प्रश्नाबाबत न बोलण्याचे मोदीचे वैशिष्ट आहे. तरुण आत्महत्या करत आहेत. मणिपूर जळत आहे पण त्याबद्दल पंतप्रधान चकार शब्द बोलत नाहीत, असे म्हणत त्यांनी टीका केली.
COMMENTS