बेळगाव/वृत्तसंस्था : कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार असून सोमवारी निवडणूक प्रचाराची सांगता झाली. राष्ट्रवादीने निपाणीत जाहीर सभा

बेळगाव/वृत्तसंस्था : कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान पार पडणार असून सोमवारी निवडणूक प्रचाराची सांगता झाली. राष्ट्रवादीने निपाणीत जाहीर सभा घेत देवेंद्र फडणवीसांवर जहरी पलटवार केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पार्सल महाराष्ट्रात पाठवा त्याचे काय करायचे ते पाहतो, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निपाणीमध्ये जाहीर सभेमध्ये केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने निपाणीमध्येच जाहीर सभा घेत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. मात्र, भाजपने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे आणि तुम्ही आमची मापे कशाला काढता? शरद पवार यांच्या झंझावातात 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले. रविवारी झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष असणारा राष्ट्रवादी कर्नाटकात काय डोंबले करणार? यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या शैलीमध्ये फडणवीसांवर हल्लाबोल करताना जोरदार प्रत्युत्तर दिलं.जयंत पाटील म्हणाले की, देशात हुकूमशाही वाढत असून विरोधात बोलणार्यांना गप्प बसवले जात आहे. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार यावं अशीच आमची इच्छ आहे.राष्ट्रवादीचे चार ते पाच आमदार निवडून येतील असा दावा पाटील यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सोलापुरात उत्तर दिले. आता मी चाललोय निपाणीला, त्यामुळे कोण पार्सल आहे, आणि कोण किती वस्ताद आहे, या सगळ्या खोलात तिथे बोलायचे, येथे नाही, असे म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना निपाणीत जाऊनच उत्तर देऊ, असे म्हटले होते.
COMMENTS