तैवानचा प्रश्न अमेरिका का उकरतेय!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

तैवानचा प्रश्न अमेरिका का उकरतेय!

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आज पाच महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. या पाच महिन्यात जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून जगातल्या सर्व प्रम

कॉन्ट्रॅक्टरवर हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांना सुपारी | LOKNews24
शिदेंच्या शिवसेनेवर नामुष्की
पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेसाठी 4 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आज पाच महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. या पाच महिन्यात जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून जगातल्या सर्व प्रमुख वित्तीय संस्थांनी या युद्धामुळेच जगाची आर्थिक घडी विस्कटली असून येणाऱ्या काळात प्रचंड आर्थिक मंदी येईल, असे केले आहे. या स्थितीला जगातील सर्वच विकसित असलेले राष्ट्र जबाबदार असल्याचा आरोप जागतिक पातळीवर केला जात आहे. त्यात सर्वात मोठी जबाबदारी ही निश्चितपणे अमेरिकेकडेच येते. ही स्थिती कमी झाली म्हणून की काय, अमेरिकेने आता जागतिक पातळीवर नवा वाद पुन्हा उकरून काढायला सुरुवात केली आहे. ज्यामुळे, जग आणखी युद्धात ओढले जाण्याचा धोका निर्माण होईल. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पोल्सी यांनी जगातील अतिशय वादग्रस्त असणारा देश तैवानला जगातील स्वतंत्र आणि मुक्त समाज असणारा देश म्हणून भेट दिली आहे. या भेटीमुळे चीन प्रचंड आक्रमक झाला असून, त्याने तैवानच्या आजूबाजूने काही प्रमाणात मिलिटरी ची कृती किंवा सैन्य कृती सुरू केली आहे. ज्यात गोळीबाराचाही समावेश आहे. १६८ लहान मोठ्या बेटांचा मिळून बनलेला तैवान हा देश, चीनने आपला अधिकृत भूभाग असल्याचा किंवा हा देश चीनचा भाग असल्याचा दावा खूप आधीच केला आहे. अर्थात तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन यांनी मात्र तैवान देश हा स्वतंत्र असल्याचा पुनरुच्चार करित अमेरिकेशी मैत्री वाढवण्याचे संकेत दिले आहेत. अर्थात चीन आज जगात सैन्य आणि आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राष्ट्र मानले जात असताना तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन यांनी आपल्या स्वातंत्र्याचा केलेला पुनरूच्चार खरोखरच अभिनंदनीय आहे. कारण, जगातील सर्व मानव समाज आपापल्या देशाच्या राजकीय स्वातंत्र्यासह सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यात नांदावा, ही खरी मानवतेची भावना आहे. मात्र, तैवानचे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे अमेरिकेचे उद्दिष्ट नाही. तर जगात सातत्याने अशांतता निर्माण करीत राहून आपला शस्त्र व्यापार साध्य करत राहणं ही अमेरिकेची भूमिका आहे. तैवानच्या स्वातंत्र्याचे एक लोकशाही नागरिक म्हणून आपण समर्थन करीत असलो तरी वस्तुस्थिती आज मात्र विपरीत आहे, हे मान्य करायला हवे. चीन हा राजकीय, आर्थिक आणि सैनिकीदृष्ट्या अतिशय बलाढ्य राष्ट्र बनला आहे. रशिया-युक्रेन युद्धामध्ये चीन हा रशियाच्या बाजूने उभा राहिलेला आहे. त्यामुळे, रशिया – युक्रेन युद्ध मिटवण्यासाठी चीनची मदत किंवा चीनला मुत्सद्दीपणाने आपल्या गटात सामील करून घेण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न करायला हवेत; परंतु, त्याऐवजी परिस्थिती आणखीन चिघळेल कशी, असा प्रयत्न अमेरिका करते आहे. तो प्रयत्न जगाला विनाशाकडे नेणारा आहे. जगाच्या शीतयुद्ध काळातही अमेरिकेने चीन हा रशियाच्या बाजूने असल्यामुळे तिबेटच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सातत्याने उचलला. परंतु, तो प्रश्न निर्णायकपणे सोडविण्यासाठी अमेरिकेने कधीही प्रयत्न केले नाहीत. याउलट दलाई लामा यांचा त्यांनी चीनच्या विरोधात राजकीयदृष्ट्या वापर करण्यात स्वतःची धन्यता मानली. तिबेट अजून चीनच्या अधिपत्याखाली आहे. तिबेटच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अमेरिकेने ना कधी ऐरणीवर आणला आणि ना कधी तो सोडविण्यासाठी जगाला आव्हान केले. त्यामुळे, सध्या युद्धजन्य परिस्थिती जगाला नको आहे. अशा काळात तैवानचा प्रश्न घेऊन अमेरिका काय साध्य करू पाहत आहे, हा प्रश्न निर्माण होतो. बहुधा, रशिया सैनिकी दृष्टीने बलाढ्य असूनही युक्रेन विरोधातील युध्दात पाच महिन्यात निर्णायक विजय मिळवू शकला नाही. याचे कारण, युक्रेन ला केली जाणारी अमेरिका आणि युरोपची सुप्त मदत. अशीच मदत तैवान ला करून चीनला लढवत ठेवून आर्थिक खच्चीकरण करावे असा हेतू तर अमेरिकेचा नाही ना?

COMMENTS