Homeताज्या बातम्यादेश

शिवसेना कुणाची ? आजपासून सुनावणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, शिवसेना नेमकी कुणाची ? यावर अजूनही निर्णय झालेला नाही, त्या

मराठी घरात मॉम, डॅड असली भाषा चालणार नाही : उद्धव ठाकरे
मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना
ईडीवर माझा विश्वास; मी पळकुटा नाही – संजय राऊत

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राज्यात सत्तांतर होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी, शिवसेना नेमकी कुणाची ? यावर अजूनही निर्णय झालेला नाही, त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य अंधातरीच होते. मात्र यावर आज मंगळवारपासून केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आयोगाने या प्रकरणावर सुनावणी सुरू केली आहे. यात दोन्ही गटाच्या वतीने दावे प्रतिदावे करण्यात येत आहे. मात्र, या सर्वांत महत्त्वाचा निर्णय अद्याप आलेला नाही. 11 डिसेंबर 2022 रोजी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. तेव्हापासून दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता या पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगात दोन्ही गटांकडून युक्तिवाद करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे निवडणूक आयुक्तांनी ऐकून घेतले आहे. शिवसेनेतील 40 आमदार आणि 12 खासदारांचा गट बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ झाली आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे 20 लाख सदस्यांचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले असल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली होती. तर शिंदे गटानेही 10.3 लाख प्राथमिक सदस्यांचे फॉर्म आणि 1.8 लाख प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेत मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे, तर उद्धव ठाकरेंनीही शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे. दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले असून शिवसेना नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू आहे. राज्यसभा सदस्य अनिल देसाई माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने कायदेशीर लढाईचे नेतृत्व करत आहेत. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीच्या लढाईनंतर उद्धव ठाकरेंविरुद्ध बंडखोरी करून एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. शिवसेनेचे सुमारे 40 आमदार आणि 12 खासदार सोबत घेण्यातही ते यशस्वी झाले. त्यामुळेच निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS