Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारामती मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही ?

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी थोपटले दंड

बारामती ः बारामतीमध्ये यंदा लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण शरद पवार गटाकडून बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या लोकस

जिल्ह्यातील 1 कोटी 7 लक्ष दस्तऐवजांचे संगणकीकरण
Nokia G310 लॉन्च! कमी किमतीत दमदार फीचर
नाशिकहून निघालेल्या लाँगमार्च मधील शेतकऱ्याचा मृत्यू

बारामती ः बारामतीमध्ये यंदा लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. कारण शरद पवार गटाकडून बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणूक लढणार आहेत, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचे समोर येत आहे. मात्र बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही ? असा सवाल करत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. त्याचाच वचपा आता बारामती लोकसभा मतदारसंघात काढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच रंगली आहे. पवार विरुद्ध पवार अशी ही लढत होणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार या तगड्या प्रतिस्पर्धी ठरणार असल्याची चर्चा सध्या बारामती सह महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. मात्र त्यातच आता अजित पवार यांना आव्हान देण्यासाठी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मैदानात उडी मारण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत आरपारची लढाई लढण्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली आहे. येथील मतदारांनी पवार कुटुंबीयांनाच का मतदान करावे? बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही? असे म्हणत विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार हल्ला चढवला. विजय शिवतारे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होते. आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून अजित पवार यांना निवडणुकीत आव्हान दिले होते. त्याचवेळी विजय शिवतरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका देखील केली होती. त्यामुळे विजय शिवतारे यांच्या विरोधात अजित पवार देखील चांगलेच आक्रमक झाले होते. ’तू यंदा कसा आमदार होतो, हे तुला दाखवतोच’ असे म्हणत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्यावर हल्ला चढवला होता. 2019 विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता.

COMMENTS