Homeताज्या बातम्यासंपादकीय

उध्दव ठाकरे यांना कोण रोखतयं?

 आज महाराष्ट्राच्या निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यालाही सुरुवात होईल. अशावेळी, महाविकास आघडीमध्ये ताणतणाव ही बाब न

आणखी एक पलटी !
राज ठाकरे यांचे तुणतुणे !
ठसठसणारे मणिपूर आणि प्रश्न ! 

 आज महाराष्ट्राच्या निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यालाही सुरुवात होईल. अशावेळी, महाविकास आघडीमध्ये ताणतणाव ही बाब निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने अतिशय जिगरीची बनली आहे. महाविकास आघाडीतील वाद हा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील जरी दिसत असला, तरी, प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाहीये. मुळातच या दोघा पक्षांमध्ये बेबनाव निर्माण करण्याची प्रक्रिया अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्या माध्यमातूनच सुरू असावी. कारण, शरद पवार हे भांडवलदार असलेल्या  अडाणींचे मित्र आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे त्यांचा पक्ष दुभंगण्यापूर्वी  अडाणी हे स्वतः शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. या सगळ्या बाबी पाहिल्या आणि धारावीची भूमी पुनर्विकासाच्या नावाखाली ज्या उद्योजकांना मिळाली तेच उद्योजक शरद पवार यांचे मित्र आहेत. त्या प्रक्रियेला उद्धव ठाकरे यांचा विरोध, मुख्यतः राजकीय सत्तेत त्यांना ज्या पद्धतीने अपमानित व्हावं लागलं आहे, त्यामुळे आहे! उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तर, कुठल्याही परिस्थितीत अडाणींच्या साम्राज्याला किंबहुना धारावीतील विकास प्रकल्पाला खोड बसेल, त्यामुळे शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यास राजी नाहीत. हा वाद अधिक चव्हाट्यावर येऊ नये, त्यामुळे, उमेदवार वाटपाचा घोळ दाखवून, वेळ निभावली जाते आहे. खरेतर, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करावा, असं स्वतः राहुल गांधी यांना देखील वाटत. कारण, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे यांचा पुढे केला तर अदानी आणि समूहाला देखील एक प्रकारे तो शह राहील. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादावरून, जी एकनाथ शिंदे आणि भाजप एका बाजूला आणि उद्धव ठाकरे एका बाजूला यांच्यामध्ये जुंपली आहे. त्यावरही उद्धव ठाकरे हेच तोडगा आहेत; कारण, टोकाच्या हिंदुत्ववादाला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी सॉफ्ट केला आहे, ती बाबही राजकारणात अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. शिवाय, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही तर, निवडणुकीनंतरची समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, उद्धव ठाकरे यांनी स्वतःच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा असं वारंवार आव्हान केले आहे. परंतु, त्या आवाहनानंतरही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न करणं, ही बाब उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांचाच विरोध असल्याचे द्योतक असल्याची मानायला राजकीय दिग्गजांची आता हरकत राहिलेली नाही.  उद्धव ठाकरे यांना जो सामना करावा लागतो आहे, तो चहू बाजूने आहे, एका बाजूला त्यांना तो राखायचा आहे. दुसऱ्या बाजूला, आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीला वरळीतून जे  आव्हान निर्माण केले गेले जात आहे, त्याकडेही त्यांना गांभीर्याने पाहावे लागेल. त्याच वेळी काँग्रेस पक्षाबरोबर जागा वाटपाचे धोरण योग्य पद्धतीने त्यांना सामावून घ्यावे लागेल आणि शरद पवार यांच्या नेतृत्वालाही त्यांना समजून घ्यावे लागेल. या सगळ्या बाबी त्यांच्या समोर आव्हानात्मक आहेत. हे आव्हान उद्धव ठाकरे हे कसं पेलतात यावर आता त्यांच्या पुढच्या सगळ्या राजकीय सत्तेची किंबहुना राजकीय निवडणुकांची खेळी अवलंबून राहील. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीत खरे आव्हान उद्धव ठाकरे यांनाच आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निर्णयाची आणि मुत्सद्दीपणाची पूर्णपणे कसोटी लागणार आहे, यात आता शंका नाही.

COMMENTS