Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात

अहमदनगर प्रतिनिधी - पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता पती दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असता पत्नीला कळल्यावर तिने थेट लग्नमंडपात जाऊन पतीला आणि नवरील

निळवंडेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचवा : आमदार आशुतोष काळे यांच्या सूचना
भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही
आत्मा मालिक रुग्णालयात कोरोना रुग्णांस विनामुल्य सल्ला

अहमदनगर प्रतिनिधी – पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता पती दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असता पत्नीला कळल्यावर तिने थेट लग्नमंडपात जाऊन पतीला आणि नवरीला चांगलाच धडा देत दोघांना पोलीस ठाण्यात खेचण्याची घटना अहमदनगर येथे घडली आहे. जालनाच्या विशाल पवार याचे लग्न छत्रपती संभाजी नगरच्या मुलीसह १२ वर्षांपूर्वी  झाला त्याने पत्नीला त्रास देत घरातून अडीच वर्षांपूर्वी घरातून हाकलून दिल्यामुळे ती आपल्या माहेरी राहत असे. विशाल पहिली पत्नी ह्यात असताना अहमदनगर मध्ये दुसरं लग्न करत असल्याची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. तिने आपल्या मुला, आई-वडील आणि नातेवाईकांसह थेट लग्नमंडपात पोहोचली आणि तिथे जाऊन गोंधळ घातला आणि नवरीला चोपले. घडलेल्या प्रकारामुळे सर्वांचा गोंधळ उडाला. वऱ्हाडी देखील घडलेल्या प्रकारामुळे गोंधळून गेले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस त्याठिकाणी आल्यावर विशाल आणि वऱ्हाडी मंडळींना पोलीस ठाण्यात नेले.  विशालवर पहिल्या पत्नी ने घटस्फोट न देता दुसरं लग्न करण्याची तक्रार दाखल केली  असून पोलिसांनी विशालच्या विरोधात भादवी 494 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्याच्या पत्नीने केली आहे. 

COMMENTS