Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हद्दपार असताना शहरात फिरणार्‍या एकास पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार असताना कोणतीही परवानगी न घेता हद्दपार आदेशाचा भंग करून शहरात वावरणार्‍या एकजण मिळ

कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार व्हावा ः आ. आशुतोष काळे
नगरला लस नसल्याने लसीकरणाला मिळाली सुट्टी
जात स्पष्ट करणारी आडनावे बदला…

अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार असताना कोणतीही परवानगी न घेता हद्दपार आदेशाचा भंग करून शहरात वावरणार्‍या एकजण मिळुन आला. त्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. ही कारवाई शहरांतील माणिक चौक येथे केली. या बाबतची माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस छत्रपती संभाजी महाराज मिरवणुक बंदोबस्त करत असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना बातमी मिळाली की, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अविनाश विश्‍वास जायभाय ( रा.दुधसागर सोसायटी केडगाव. अ.नगर ) यास तडीपार आदेश असताना तो माणिक चौक परीसरात फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीसांनी माणिक चौकात जाऊन त्याचा शोध घेतला असता तो माणिक चौक परिसरात वावरताना मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अविनाश विश्‍वास जायभाये ( रा. दुधसागर सोसायटी केडगाव अ.नगर ) असे सांगितले त्यास हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधिक्षक यांच्याकडील हद्दपार आदेश दि. 19 मे 2022 रोजी पासुन संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला असुन सदरचा हद्दपार कालावधी आद्याप पर्यंत संपलेला नसतानाही तो नगर शहरात माणिक चौक परिसर येथे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास अहमदनगर शहरात कोणाच्या परवानगीने आला या बाबत विचारपुस केले असता त्याने मी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतले नाही असे सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्ह्यांची नोंद केली

COMMENTS