Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी बस स्थानकासाठी मंजूर झालेले 5 कोटी गेले कोठे ?

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी वेधले लक्ष

राहुरी/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्‍या व दुर्लक्षित अशा राहुरी बस स्थानकासाठी सव्वा वर्षापासून पाच कोटी रुपयांचा निध

मुख्यमंत्र्यांमुळे नगरला मिळाला ऑक्सिजन
घरगुती गॅस ग्राहकांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावे
पाथर्डी नगरपालिकेच्या शहर पथविक्रेता समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसची मुसंडी

राहुरी/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्‍या व दुर्लक्षित अशा राहुरी बस स्थानकासाठी सव्वा वर्षापासून पाच कोटी रुपयांचा निधी महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाला होता. त्याचे पुढे काय झाले ? असा सवाल माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे.
पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राहुरी बस स्थानक हे गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. गेल्या दोन तीन वर्षांपासून बस स्थानक केव्हा पडेल व काही दुर्घटना होऊ शकते , अशी स्थिती झालेली असताना ज्येष्ठ नेते व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी या प्रश्‍न लक्ष घातले . तनपुरे यांनी जानेवारी 2021 ला महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राहुरी बस स्थानकाच्या नूतनीकरणाची मागणी केली . श्री पवार यांनी राहुरीतील एका सभेत ही मागणी मान्य करून तात्काळ इमारत बांधकामाचे मंजुरी देण्याची घोषणा देखील केली होती. मे 2019 मध्ये बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाकडून 17 कोटी 25 लाख रुपयांच्या कामाला तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून मान्यता दिली गेली. 11 फेब्रुवारी 2022 रोजी शासनाच्या आदेशानुसार राहुरी बस स्थानकाच्या कामासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. यावेळी दिलेल्या आदेशात प्रशासनाच्या नाशिक प्रादेशिक कार्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी खात्याला राहुरी बस स्थानकाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाच्या वास्तुविशारद यांच्याकडून सविस्तर नकाशे व अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्या तांत्रिक मान्यतेनंतर निविदा मागवण्याचही आदेश देण्यात आले होते. त्यावेळी महाविकास आघाडीच्या काळात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

मध्यंतरीच्या काळात आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांचे युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. राहुरी बस स्थानकाच्या नूतन इमारती संदर्भातील प्रश्‍न मात्र तसाच प्रलंबित राहिला. शिर्डी, शनिशिंगणापूर, कृषी विद्यापीठ या महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी राहुरी बस स्थानक हे जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या बस स्थानकाच्या दुरावस्थेची चर्चा जिल्ह्याचे राज्यभरात पसरलेली आहे. गेल्या सव्वा वर्षांपासून मंजूर झालेला पाच कोटी रुपयांचा निधी चे पुढे काय झाले? याबाबत राहुरी सह नगर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. या निधीचे पुढे काय झाले ? सरकार कोणाचेही असो प्रवाशांच्या हितासाठी राहुरी बस स्थानकाची इमारत झाली पाहिजे.
ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे

COMMENTS