Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिलोली तालुक्यातील पाणंद रस्ते होणार तरी कधी?

प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत : शेतकर्‍यांना होतोय नाहक त्रासबिलोली । प्रतिनिधीतालुक्यातील बडूर,  बामणी शिवारातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाच्

 जामखेडमध्ये घरफोडी – लाखोंचा ऐवज लंपास
चंदन टोळीचा सिरसाळा पोलिसांनी केला पर्दाफाश
नाशिकमध्ये मोबाईलचा स्फोट होऊन 3 जण जखमी

प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत : शेतकर्‍यांना होतोय नाहक त्रास
बिलोली । प्रतिनिधी
तालुक्यातील बडूर,  बामणी शिवारातील शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिव पाणंद रस्त्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत,पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कामे पूर्ण करण्याचे  शासन स्तरावरून आदेश असताना मात्र जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतल्याने शेतकर्‍यांना भर पावसाळ्यात पेरणी करण्यासाठी गाडी जात नसल्याने याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ येते.तातडीने शेत शिवार रस्ते करण्याची मागणी बाळासाहेब रंगनाथराव कुलकर्णी यांनी  9 जानेवारी रोजी तहसीलदार बिलोली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तहसील प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात  नमूद करण्यात आले की, बडूर, बामणी शिवारातील शिव पाणंद रस्ता सध्या अतिक्रमण, झाडे-झुडपे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत खराब अवस्थेत असून त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीमालाची वाहतूक, शेतीसाठी लागणारे साहित्य ने-आण करणे तसेच दैनंदिन शेतीकाम करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेच्या शासन निर्णयानुसार शिवारातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांचे रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण करणे अपेक्षित असताना या योजनेअंतर्गत होणारा संपूर्ण खर्च शासनामार्फत करण्यात येतो व शेतकर्‍यांवर कोणताही आर्थिक भार टाकण्यात येत नाही, असेही अर्जात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान बडूर, बामणी शिव पाणंद रस्त्यावर झालेली सर्व अतिक्रमणे तातडीने काढून रस्ता पूर्णपणे मोकळा करावा, आवश्यक पाहणी करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी व संबंधित शेतकर्‍यांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी अर्जदार बाळासाहेब रंगनाथराव कुलकर्णी यांनी केली आहे. या मागणीमुळे बडूर, बामणी शिवारातील शेतकरी वर्गामध्ये अपेक्षा निर्माण झाली असून प्रशासनाने या विषयावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,  शासनाच्या आदेशाला तहसील प्रशासन  केराची  टोपली दाखवत असेल तर शेतकर्‍यांना  आंदोलना शिवाय पर्याय नाही, कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासणाला  जाग कधी येणार हा संशोधणाचा विषय बनला आहे.

COMMENTS