नाशिक प्रतिनिधी - सातपूर विभागांमध्ये सध्या मोठे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून रोलेट जुगार ऑनलाइन गेम गांजा चरस अशा अवैध धंद्यांच्या माध्यमातून अ
नाशिक प्रतिनिधी – सातपूर विभागांमध्ये सध्या मोठे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून रोलेट जुगार ऑनलाइन गेम गांजा चरस अशा अवैध धंद्यांच्या माध्यमातून अनेक लोकांची घर उध्वस्त करण्याचं काम काही समाजकंटक करत असून यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांची चौकशी व्हावी या समाजकंटकांवर जर बसविण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यासाठी आपण आपल्या स्तरावर निर्देश देण्यात यावे असे सातपूर परिसरातील जनतेची मागणी आहेत.जनता समोर येण्याचे धाडस करतांना दिसत नसल्याने आम्ही सर्व सामाजिक, राजकीय माताबघीणी एकत्र येऊन आता आपणास नक्की विचारू की
पोलीस प्रशासन आता पुढचे पाऊल आपणांस उचलायला हवे नाहीतर जनता थांबणार नाहीत. काही राजकीय लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी पोलीस प्रशासनावर चुकीचे आरोप करून पोलीस प्रशासनाला बदनाम करण्याचं कामही करत आहेत चौका चौकात सभा घेऊन लोकांना धमकवणे सर्वसामान्य गरीब जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे त्यांच्यावर जबरदस्ती करून तुम्ही आमच्या सोबतच राहिले पाहिजे नाहीतर तुमचे घरदार अतिक्रमण मध्ये सांगून पाडून टाकू तुमचे काही भांडण झाले तर पोलिसांकडे न जाता माझ्याकडे या आम्ही तुम्हाला न्याय देऊ आम्ही सत्ताधारी पार्टीत आहोत आमच्या पक्षाची सत्ता आहे आम्ही जे सांगू तेच होणार त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षांच्या लोकांसोबत तुम्ही किंवा तुमच्या मुलांना जाऊ देऊ नका ते जर गेले तर तुमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य बरबाद करून टाकील तुम्ही फक्त आणि फक्त आमच्या कुटुंबाचे प्रामाणिक राहायचं बाकी कोणाचेही ऐकायचे नाही.अशा धमक्या चौकाचौकात सभा घेऊन काही राजकीय लोक करत आहे.यांनी चौक सभा कोणत्या अधिकाऱ्याने घेतल्या पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती का? याचीही चौकशी करावी सातपूर आणि गंगापूर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात खोटे अर्ज देऊन तुम्ही मी सांगेल ते करा अन्यथा तुमच्या विरोधात मोर्चा काढेल तुमच्या बदल्या करून टाकेल तुम्ही करत असलेल्या कामाच्या तक्रारी करून पोलीस प्रशासनावर दबाव तंत्र टाकण्याचे काम काही राजकीय लोकं करत आहे.यापूर्वी सुद्धा अनेक वेळा यांनी असे प्रकार करून पोलीस अधिकाऱ्यांनवर दबाव टाकण्याचे काम केलेले आहे.त्यांचीही चौकशी आपण करावी आणि आमच्या या भागाला अशा या लोकांपासून संरक्षण द्यावे सध्या शिवाजीनगर, श्रमिक नगर मध्ये जे काही टवाळखोर उपद्रव माजवत आहेत. ह्या सगळ्यांचे रेकॉर्ड चेक करावे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सर्व टवाळखोरांवर गावगुंडी गुन्हेगारांवर कारवाई व्हावी परंतु त्याच बरोबर यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय शक्तींना सुद्धा आवर घालावां ही नम्र विनंती.
यावेळी निवेदन देताना मा.महिला बालकल्याण सभापती हेमलता कांडेकर,सामाजिक कार्यकर्ते सविता गायकर,माजी सभापती सदाशिव दादा माळी,दिनकर कांडेकर ,श्रीराम मंडळ, मंगला खोटरे कधी पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS