संस्काराच्या नावाखाली पंतप्रधानच संविधानाला कनिष्ठ संबोधतात तेव्हा..!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

संस्काराच्या नावाखाली पंतप्रधानच संविधानाला कनिष्ठ संबोधतात तेव्हा..!

राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोन्ही पदे देशाची सर्वोच्च संवैधानिक पदे आहेत. एक देशाचा नामधारी प्रमुख तर दुसरा देशाचा संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी प्र

पतीला सोडून शिक्षिका पत्नी मुख्याध्यापकासह फरार
करुणा मुंडेंची 31 लाखांची झाली फसवणुक
एसबीसी प्रवर्गाच्या साप्ताहिक आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोन्ही पदे देशाची सर्वोच्च संवैधानिक पदे आहेत. एक देशाचा नामधारी प्रमुख तर दुसरा देशाचा संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी प्रमुख. या दोन संवैधानिक पदाच्या व्यक्तींना एकमेकांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी संविधानाचा प्रोटोकॉल आहे. ज्या संविधानाच्या आधारे ही दोन्ही पदे ज्या व्यक्तींना मिळतात त्यांनी त्या पदाची आणि संविधानाची या दोघांचीही गरिमा राखणं, हे त्यांचे त्या पदावरील आद्यकर्तव्य असते. परंतु सध्याचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोघांनाही या गोष्टीचे भान राहिले आहे की नाही, असा प्रश्न आता निर्माण होऊ पाहतो आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात परोख या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गावी, एका जाहीर कार्यक्रमासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधानाचे आगमन झाल्यानंतर संविधानाच्या प्रोटोकॉल नुसार राष्ट्रपती त्यांना रिसीव्ह करण्यासाठी जाऊ शकत नाही; परंतु, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी थेट हेलिपॅड जवळ पंतप्रधानांना रिसिव्ह करण्यासाठी राष्ट्रपतींनी कूच केले. या घटनेला संविधानाच्या प्रोटोकॉल पेक्षा हा संस्कार फार महत्त्वाचा आहे, असे त्याचे वर्णन पंतप्रधान करतात. यासाठी त्यांनी खुद्द महात्मा गांधी यांचे उदाहरण देत अशा संस्कारांसाठी भारतीय खेडी फार प्रसिद्ध आहेत, त्यामुळे खेड्यांचे सक्षमीकरण करणे हे अतिशय गरजेचे आणि महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही वक्तव्यातून दोन बाबी फार स्पष्ट होतात, पहिली बाब म्हणजे संस्कारांपेक्षा संवैधानिक पदावरच्या लोकांचे प्रोटोकॉल त्यांना महत्त्वपूर्ण वाटत नाहीत आणि दुसरी ज्या खेड्यांच्या रचनेला या देशातील फुले-शाहू-आंबेडकर यांचा विरोध राहिला, या तिन्ही महापुरुषांनी आपले कार्य महानगरातूनच केले. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांनी आपले कार्य पुणे सारख्या महानगरातून अविरत केले, छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर येथून आपले सामाजिक राजकीय कार्य अविरतपणे केले; तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईसह देशाच्या पाच महानगरांमधून आपले कार्य प्रामुख्याने सुरू ठेवले. याउलट महात्मा गांधी यांनी आपल्या कार्यासाठी सेवाग्राम सारखा ग्रामीण भाग निवडला. ग्रामीण आणि शहरी भागाच्या या रचनांमधून एक बाब फार प्रकर्षाने स्पष्ट होते की ग्रामीण भागात किंवा या देशातील खेडी ही जातिसंस्था आणि त्या जाती संस्थेची उतरंडीची विषमता कायम – अबाधित ठेवणारी संस्कृती आहे. त्यामुळे या संस्कृती ला भेदणे हा या तिन्ही महापुरुषांचा उद्देश होता आणि नेमका या तिन्ही महापुरुषांच्या विचारांच्या विरोधात भारतीय खेड्यांच्या जात वैशिष्ट्याचे एक प्रकारे देशाचे पंतप्रधान समर्थन करतात. ही बाब देशाच्या जनतेसाठी अनाकलनीय अशी आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ज्या पद्धतीने त्यांना हेलिपॅड वरून रिसिव्ह करण्याचा आपला कृती कार्यक्रम केला, तो संवैधानिक पदावर राहून अशोभनीय आहे. प्रोटोकॉल तोडणारा आणि संविधानाच्या मर्यादा भंग करणारा आहे. परंतु यालाच पंतप्रधान जर संस्कार म्हणत असतील तर हा संस्कार जातीच्या उतरंडीवर असणाऱ्या व्यक्तीने संविधानिक पदावर आल्यानंतरही आपल्या मनातील जातीचा न्यूनगंड कायम राखणं, असाच हा प्रकार म्हणता येईल! कारण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना जातीची न्यूनगंडाची मानसिकता त्यांच्यावर झालेल्या संघ भाजपा संस्कारांमुळे अजूनही भंग पावलेली नाही, हे सिद्ध होते. राष्ट्रपती यांच्या अशाप्रकारच्या मानसिकतेची अनेक उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडणे आणि पंतप्रधानांना प्रोटॉकल तोडून रिसिव्ह करणे किंवा त्यांचे स्वागत करणे, या बाबी लोकशाही व्यवस्थेतील संविधानाच्या मर्यादांचा भंग करणाऱ्या आणि जाती संस्थेच्या मानसिकतेला उजाळा देणाऱ्या आहेत!

COMMENTS