Homeताज्या बातम्या

जेव्हा आमदार सत्यजित तांबे शिक्षक होतात..

संगमनेर (प्रतिनिधी)--समाजाच्या विकासात शिक्षकांचा अत्यंत मोलाचा वाटा असून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना अभिवादन करताना महाराष्ट्राचे युवा आम

माऊली प्राथमिक विद्यालय व आदर्श बालवाडी मध्ये रंगला आषाढी एकादशीचा सोहळा
देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच! प्रा. डॉ.सुभाष वाघमारे
राहुल गांधी, ओबीसींची माफी मागा, भाजपची जालन्यात निदर्शने आणि जोडे मारो आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी)–समाजाच्या विकासात शिक्षकांचा अत्यंत मोलाचा वाटा असून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना अभिवादन करताना महाराष्ट्राचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी शाळेत जाऊन पुस्तक, खडू, डस्टरसह विद्यार्थ्यांना भूमिती व इंग्रजी हे विषय शिकवले.सह्याद्री विद्यालय संगमनेर येथे आमदार सत्यजित तांबे यांनी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व भूमिती विषय शिकवले आमदार सत्यजित तांबे यांनी इंग्रजी विषय शिकवताना इंग्रजीचे महत्त्व मोठे असून इंग्रजीला घाबरू नका असे सांगताना करियर साठी हा विषय प्रत्येकाला आवश्यक आहे. मोठी स्वप्ने पहा त्याबरोबर चांगला अभ्यासही करा. दडपण न घेता हसत खेळत शिका म्हणजे शिक्षण सुद्धा आनंदाचे वाटेल असे सांगितले. त्याचबरोबर सोशल मीडिया आणि मोबाईल हे पाहण्याचे आपले वय नाही. तर पुस्तके अभ्यासण्याचे हे वय आहे. इंग्रजी ही वाघिणीचे दूध आहे अशी आपली म्हण आहे. परंतु आता या दुधाची प्रत्येक विद्यार्थ्याला गरज आहे. इंग्रजी सोपी आहे तिचा बाऊ करू नका. इंग्रजीला न घाबरताना आत्मसात करा असा सल्ला दिला याचबरोबर विद्यार्थ्यांशी अनेक प्रश्न उत्तरेही केली. तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना भूमिती शिकवताना भूमिती हा जीवनाचा अविभाज्य भाग असून गोल ,त्रिकोण, चौकोन हे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहत असतो. गणितामध्ये भूमिती महत्त्वाची आहेच परंतु जीवनामध्येही ती महत्त्वाची आहे. जगाच्या पाठीवरील सौदी अरेबिया मध्ये नव्याने द लाईट नावाचे शहर उभे राहत आहे. 170 किलोमीटर लांब आणि 200 किलोमीटर रुंद अशा या शहरातून जगात कुठेही सहा तासात आपण पोहोचू शकतो. या शहरांमध्ये एक कोटी नागरिक राहू शकतात असे हे शहर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात 14 मैलावर भाषा बदलते, आपल्याकडे जेवणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. राहणीमान वेगळे आहेत. महाराष्ट्रातच खानदेशी, मराठी, वराडी , कोकणी,अशा भाषा आहे .मात्र तरीही एकता ही आपली मोठी ताकद आहे असे सांगताना जशी आई आपल्या प्रत्येक मुलाला जीव लावते पालन पोषण करते तसेच प्रत्येक वडील सुद्धा मुलाच्या भविष्यासाठी चिंतित असतात. म्हणून आई-वडील हे दोनही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे .याचबरोबर आई-वडिलांनंतर जे आपल्याला घडवतात त्या शिक्षकांप्रतिही प्रत्येकाने कायम कृतज्ञ राहिले पाहिजे असा मौलिक सल्लाही बालगोपाळांना दिला. आमदार सत्यजित तांबे आज शिक्षक झाले हे पाहू सर्व विद्यार्थी भारावले .यानंतर सह्याद्री संस्थेचे सह सेक्रेटरी दत्तात्रय चासकर यांनी सह्याद्री संस्थेची माजी विद्यार्थी व विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार केला.

COMMENTS