गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अॅटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हार्ट अॅटॅकच्या बळी ठरत आहेत. लक्षात घेण्यासारखी बाब

गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अॅटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हार्ट अॅटॅकच्या बळी ठरत आहेत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे हार्ट अॅटॅक ही आता फक्त ‘पुरुषांची समस्या’ राहिलेली नाही. अलीकडच्या काळात स्त्रियांनादेखील हार्ट अॅटॅकचा सामना करावा लागत आहे. अनेक जण सायलेंट हार्ट अॅटॅकचे बळी ठरत आहेत. हैदराबादमधील यशोदा हॉस्पिटल्सचे क्लिनिकल डायरेक्टर आणि इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजीचे सीनिअर कन्सल्टंट व टीएव्हीआरचे प्रमाणित प्रॉक्टर डॉ. व्ही. राजशेखर सांगतात, “सायलेंट हार्ट अॅटॅक ही अशी समस्या आहे ज्यामध्ये संभाव्य हार्ट अॅटॅकची फारच कमी प्रमाणात लक्षणं दिसतात.”हार्ट अॅटॅकला ‘सायलेंट’ तेव्हाच म्हणतात जेव्हा छातीत दुखणं, हात व मान दुखणं यासारखी लक्षणं व्यक्तीला जाणवत नाहीत. डॉ. व्ही. राजशेखर म्हणतात, “सायलेंट हार्ट अॅटॅकची लक्षणं अशी असू शकतात जी निरुपद्रवी वाटतात. ही लक्षणं जाणवू लागली तरी छातीत जळजळ किंवा अपचन यासारख्या सामान्य समस्या असल्याचा व्यक्तीचा समज होतो.”
सायलेंट हार्ट अॅटॅक आलेल्यांपैकी बहुतांश व्यक्तींना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आणि हार्वर्ड हेल्थनं केलेल्या 2015मधील एका अभ्यासानुसार, 45 ते 84 वर्षे वयोगटातील जवळजवळ दोन हजार व्यक्ती ज्यांना कधीही हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी विकार नव्हता त्यांनादेखील पुढील 10 वर्षांत हार्ट अॅटॅक आला आहे. अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या शरीरावर मायोकार्डियल स्कार्स होते. “सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यापैकी 80 टक्के लोकांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती नव्हती. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये मायोकार्डियल स्कार्स होण्याचे प्रमाण पाच पट जास्त होतं,” असंही या अभ्यासात निदर्शनास आलं.
COMMENTS