Homeताज्या बातम्यासंपादकीय

या राड्याचा अर्थ काय !

  महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, महाराष्ट्राचे राजकारण आणि खासकरून सत्ताकारण एका

डॉ. रामकृष्ण जगताप यांची ’श्रीरामपूर साहित्य परिषद ’अध्यक्षपदी निवड
कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची ग्वाही
कसब्यात 45 तर, चिंचवडमध्ये 41 टक्के मतदान

  महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, महाराष्ट्राचे राजकारण आणि खासकरून सत्ताकारण एका नव्या वळणावर येऊन उभे राहिले आहे! अर्थात, या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी लातूरला घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान छावा संघटनेच्या विजय घाटगे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केलेली मागणी, ज्यामध्ये कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेतला जावा, या मागणीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष यांच्या रक्तात सळसळ झाली. त्यांनी थेट छावा संघटनेचे अध्यक्षांना आपल्या गुंडांकर्वी मारहाण केली. (मारहाण करणाऱ्यांना कार्यकर्ते म्हणताच येणार नाही). या घटनेचे पडसाद अतिशय तीव्र उमटले. परंतु, कोकाटे यांचा राजीनामा सोडून अजित दादा पवार यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना तात्काळ राजीनामा द्यावयास सांगितले. अर्थात, ही घटना म्हणजे मोठा मासा वाचविण्याचीही खेळी  असण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून उमटली. सुनील तटकरे हे शांतपणे पत्रकार परिषद घेत असताना ज्या पद्धतीने छावा संघटनेने आपले आंदोलन केलं, ते अभिनवच म्हणावं लागेल. मात्र, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमागे कृषी मंत्र्यांचे अगदी पदाला न साजेशी असणारी प्रतिमा ज्या दृकश्राव्य माध्यमातून देशभरात पसरली, ती धक्कादायक आहे. या घटनेचा राग राज्यातील जवळपास सर्वच जनतेला होता. कारण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्यावर गंभीरपणे पाऊल उचलण्याची गरज असताना, जर कृषी मंत्री अशा प्रकारे आपल्या कार्यालयात किंवा सभागृहात आपल्या टेबलाखाली जुगार खेळत असेल, तर, ती घटना शेतकऱ्यांच्या दुःखाला अधिक गडद करणारी आहे. कारण, अशा प्रकारचा कृषी मंत्री महाराष्ट्रात यापूर्वी झाला नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अशा प्रकारच्या कृषी मंत्र्याला सहन ही करणार नाहीत. त्यामुळे, आज ना उद्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा अजित दादा पवार यांना घ्यावाच लागेल. कारण शेतकरी हा ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हवालदिल झाला आहे, त्यावर गंभीर उपाय योजना करण्याचा विचार सोडून, जर मंत्री इतक्या पोरकट पद्धतीने आपला विभाग सांभाळत असतील तर, शेतकऱ्यांचा राग अनावर झाल्याशिवाय राहणार नाही! मात्र, त्यातच आता महाराष्ट्रामध्ये मराठा समूहाचे राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्या दरम्यानचे मतभेद तीव्र होत असल्याचे दिसू लागले आहे.  यापूर्वी महाराष्ट्राचे वैचारिक प्रबोधनकार प्रविणदादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला आणि छावा संघटनेचा नेता विजय घाडगे यांच्यावर झालेला हल्ला आणि या दोन्ही हल्ल्यामागे असलेलं मराठा समूह कनेक्शन, या दोन्ही बाजू  मारहाण करणारे आणि हल्ला ज्यांच्यावर झाले ते असा सगळा घटक हा मराठा समूहातून आहे. याचं सामाजिक विश्लेषण निश्चितपणे होईल. परंतु, या घटना ज्या आकाराला आल्या आहेत, त्यामागे  समाजातील नव तरुणांना एक प्रकारे चीड निर्माण झाली आहे. ही चीड बेरोजगारी किंवा महागाई अथवा शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे कृषीमंत्र्यांनीच गांभीर्याने न पाहणं, या सगळ्या बाबी कारणीभूत आहेत. परंतु, सध्या रस्त्यावर आलेली ही लढाई महाराष्ट्राचे समाज जीवन सांस्कृतिकदृष्ट्या प्रदूषित करणारे राहील आहे काय, यावर आता महाराष्ट्राच्या नव विचारवंतांना, तरुणांना विचार करावा लागेल. कारण, अशा प्रकारच्या हिंसक घटना महाराष्ट्रात तुरळक पद्धतीने घडत होत्या. परंतु, आता ती पद्धत रूढ होऊ पाहते आहे आणि म्हणून समाजाच्या सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने या घटना अतिशय चिंताजनक आहे यात कोणतीही शंका नाही.

COMMENTS