Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुमच्या घरी छापे पडल्यानंतर पक्षाने काय करायचे?

खासदार शरद पवारांनी हसन मुश्रीफांना फटकारले

कोल्हापूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटातील आपल्या सहकार्‍यांना चांगलेच फटकारत आपण कदापी भाजपसोबत जाणार

गृहमंत्र्यांनी महिला सुरक्षेकडे लक्ष द्यावे
एकीकडे टीका, दुसरीकडे एकाच गाडीतून प्रवास
पक्षफुटीनंतर आज शरद पवार प्रथमच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात

कोल्हापूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटातील आपल्या सहकार्‍यांना चांगलेच फटकारत आपण कदापी भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर होत आहे. याचबरोबर पवार यांनी हसन मुश्रीफांना फटकारत तुमच्या घरी छापे पडल्यानंतर पक्षाने काय करायचे ? असा सवाल केला आहे.

ईडीचे छापे पडले तेव्हा पक्षाकडून सहकार्य झाले नाही या अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या दाव्याबाबत पत्रकार परिषदेत शरद पवारांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पक्षाने काय करायचे? तुमच्या घरी छापा पडला तर पक्ष काय करू शकतो? यात पक्षाला हस्तक्षेप करता येत नाही. आम्ही कुणाच्याच बाबतीत हस्तक्षेप केला नाही. अनिल देशमुख तुरुंगात गेले. संजय राऊत तुरुंगात गेले. नवाब मलिक गेले. त्यामुळे आमच्यातल्या काही लोकांना तुरुंगात जावे लागले. पण जे गेले नाहीत, ते भाष्य करत आहेत, असे शरद पवार म्हणाले. यांची (हसन मुश्रीफ) सुटका कशी झाली हे मला माहिती नाही. त्यांनी कुणाशी सुसंवाद साधला हे मला माहिती नाही. ज्या अर्थी त्यांच्यावर आधी कारवाई झाल्याचे आम्ही वाचले आणि नंतर पुढची कारवाई थांबली याचा अर्थ काहीतरी सुसंवाद झाल्याचे दिसत आहे, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, शिंदेगट गुवाहाटीला गेला तेव्हाच राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांसह 53 आमदारांनी शरद पवारांना सत्तेत सहभागी होण्याची परवानगी मागितली होती, असे हसन मुश्रीफ म्हणाले. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी त्यावर टीका केली. 53 असो वा 100 असो.. तुम्ही मते कुणाच्या नावावर मागितली? मते भाजपच्या नावाने मागितली का? कुणाच्याबरोबर जायचे म्हणत आहेत? भाजपाबरोबर? भाजपच्या विरुद्ध आम्ही निवडणुका लढल्या. आम्ही लोकांना भाजपाला मते द्यायला सांगितले नाही. मग लोकांनी आम्हाला तशी मते दिल्यानंतर मतदारांना फसवणे हे माझ्या चौकटीत बसत नाही. त्यांनी दिलेले पत्र म्हणजे काही निर्णय होत नाही, असे शरद पवारांनी नमूद केले.

ईडीच्या छाप्यानंतर पक्षाकडून सहानुभूती नाही ः हसन मुश्रीफ – अजित पवार गटासोबत गेलेले हसन मुश्रीफ यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. शरद पवार नेते आहेत. त्यांची विचारधारा, त्यांचे विषय, त्यांचा मी सन्मान करतो. पण भावना लक्षात घेतली पाहिजे. जानेवारीत माझ्यावर पहिल्यांदा ईडीचा छापा पडला. आम्ही न्यायालयातच लढा दिला. अनेक लोकांवर जेव्हा कारवाया झाल्या, तेव्हा सहानुभूती, मदत झाली. पण माझ्याबाबतीत तसे काही झाले नाही. ठीक आहे. आम्ही आमच्या समस्या सोडवू, असे हसन मुश्रीफ म्हणाले. 2014 ला भाजपाला पाठिंबा दिला तेव्हा ईडी होती का? 2017 ला होती का? 2019 ला होती का? 2022-23 ला आम्ही सह्या केल्या तेव्हाही ईडी नव्हती. जेव्हा 45 आमदार एकत्र येतात, तेव्हा सगळ्यांमागे ईडी आहे का? हा सामुहिक निर्णय आहे, असेही हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.

शरद पवारांचे गनिमी काव्याने युद्ध सुरू : संजय राऊत – राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्याचा दावा करणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा घूमजाव करत शरद पवार गनिमी काव्याने युद्ध लढत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी राष्ट्रवादीविषयी मवाळ भूमिका घेतली आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवार आपल्याच सहकार्‍यांशी गनिमी कावा या पद्धतीने युद्ध लढत आहेत. आम्ही कालच याबाबत चर्चा केली. शरद पवार इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत. ते कधीही भाजपसोबत जाणार नाही. शरद पवार यांच्या भूमिकेविषयी आमच्या मनात आता कोणताही संभ्रम नसल्याचे म्हटले आहे.  

COMMENTS