पश्चिम बंगाल : राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री बनणार कुलपती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पश्चिम बंगाल : राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री बनणार कुलपती

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी अतिशय विलक्षण निर्णय घेतला.त्यानुसार आता राज्यातील विद्यापीठांमध्ये राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री कुलपती असणार आ

क्रांतिकारकांनी जातीयवादी शक्तींना थारा दिला नाही : आ. जयंत पाटील
नेवासा शहरातील नागरी समस्यांविरोधात उपोषण
क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी अतिशय विलक्षण निर्णय घेतला.त्यानुसार आता राज्यातील विद्यापीठांमध्ये राज्यपालांऐवजी मुख्यमंत्री कुलपती असणार आहेत. यासंदर्भात लवकरच विधानसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे. पश्चिम बंगालच्या राज्यमंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्री ब्रात्य बसू यांनी सांगितले की, बंगाल मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सरकारी विद्यापीठांचे कुलपती बनवण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव लवकरच विधानसभेत विधेयकाच्या रूपात मांडण्यात येईल. आतापर्यंत राज्यपाल हे राज्य विद्यापीठाचे कुलपती होते. दरम्यान, बंगालमधील राज्यपाल कार्यालय आणि ममता सरकारमधील वाद अनेकदा चर्चेत राहिले आहेत. राज्यपाल जगदीप धनखड हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

COMMENTS