Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेस शाळेच्या चिमुकल्यांनी जागविला देशभक्तीचा जागर

कोपरगाव तालुका ः प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर रक्षण करणारा भारतीय जवान, त्यांनी दाखवलेले शौर्य, त्यात आलेले वीरमरण,जवानांच्या कुटुंबाने फोडल

डिग्रस येथील चौकास त्यागमूर्ती रमाई आंबेडकर नाव द्यावे
पैशाच्या त्रासाला कंटाळून गजराज नगरमध्ये एकाची गळफास
रामगिरीजी महाराजांसह संत कौस्तुभ आणि स्वप्ना जाधव नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव तालुका ः प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर रक्षण करणारा भारतीय जवान, त्यांनी दाखवलेले शौर्य, त्यात आलेले वीरमरण,जवानांच्या कुटुंबाने फोडलेला टाहो, वरील प्रसंग पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा नकळतपणे पाणावल्या औचीत्य होते  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेस शाळेत स्नेहसंमेलन.
भव्यदिव्य रांगोळी फटाक्यांची आतिषबाजी आणि पालकांच्या प्रचंड उत्साहात डोळ्यांची पारणे फेडणार्‍या कार्यक्रमाचे उद्घाटन कोपरगावच्या गटशिक्षणअधिकारी शबाना शेख यांनी केले. कला मंचावर प्रमुख अतिथी पोहेगाव विस्तार अधिकारी इंदुमती धट, पोहेगाव केंद्रप्रमुख भारती शेळके, माजी मुख्याध्यापक  संतू वाकचौरे, शामराव भालेराव, संतोष दिवे उपस्थित होते. यावेळी पाचवी शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा  सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वर्षभर चालणारे विविध शैक्षणिक उपक्रम व त्यात मिळणारा पालकांचा प्रचंड प्रतिसाद याचा विशेष उल्लेख करून गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. शाळेचे माजी मुख्याध्यापक संतोष दिवे यांनी शालेय ग्रंथालयासाठी चार हजार रुपयांचे पन्नास पुस्तके शाळेस भेट म्हणून दिले. यावेळी महिला, पालक, विद्यार्थी व  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक शिरसाठ यांनी केले. तर सूत्रसंचालन वैशाली मोरे, नलिनी साळवे,  वाल्मीक खंडीझोड यांनी केले. आभार हरिभाऊ ठाणगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कमिटी सदस्य पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS