Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार योगेश टिळेकर यांचे कर्जत-जामखेडमध्ये स्वागत

कर्जत ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार योगेश टिळेकर यांनी बुधवारी सायंकाळी भेट द

रामनाथ भोजने 38 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त
खासदार नीलेश लंकेंना आत्ताच उपरती का ?
निळवंडे धरणाच्या पंचम सुधारीत प्रशासकीय मंजुरी

कर्जत ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी या जन्मगावी भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार योगेश टिळेकर यांनी बुधवारी सायंकाळी भेट देत अभिवादन केले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे व शिंदे कुटुंबियांनी त्यांचे स्वागत केले. माळी समाजाचे नेते योगेश टिळेकर यांना भाजपने विधान परिषदेवर संधी दिली आहे. त्यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतल्यानंतर सोलापूर आणि अहिल्यानगर दौर्‍याची घोषणा केली. त्यांच्या दौर्‍यात संत सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याबरोबरच राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथील स्मारकास भेट देण्याचा समावेश होता.
याप्रसंगी, टिळेकर यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देत अभिवादन करत आशिर्वाद घेतले. त्यानंतर आमदार प्रा. राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली, जिथे प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे, पत्नी आशाताई शिंदे व स्वतः प्रा. राम शिंदे यांनी आमदार टिळेकर यांचा सन्मान केला. जामखेड तालुक्यात टिळेकर यांचे आगमन झाल्यावर त्यांचे भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विष्णू गंभीरे, भाजपा तालुका सरचिटणीस पांडुरंग उबाळे, नगरसेवक डॉ. ज्ञानेश्‍वर झेंडे, सोमनाथ पाचरणे, बापुराव ढवळे, चोंडी ग्रामस्थ आणि अन्य कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश महामंत्री विनोद दळवी, कोंभळीचे सरपंच राहुल गांगर्डे, भाजपा नेते संपत बावडकर, कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. आमदार योगेश टिळेकर यांनी या दौर्‍यात सांगितले की, राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आशिर्वादाने विधान परिषदेच्या आमदारकीचा कारभार सुरू केला आहे. भाजपाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, याबद्दल मी कृतज्ञ आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

COMMENTS