Homeताज्या बातम्यासंपादकीय

कोचिंग’वर हातोडा स्वागतार्ह ! 

राजकीय सत्ता समविचारी नसेल तर, त्यांचे सर्वच निर्णय चूक, अशी धारणा मनात धरणे, हे सर्वस्वी चूक असते; परंतु, विरोधात असणाऱ्या पक्षांची मानसिकता नेह

सर्वोच्च न्यायालयाचे दोन निर्णय आणि टायमिंग ! 
विवेकाचा नंदादीप पेटत राहो !
तज्ज्ञांच्या मते, सत्ताबदल अटळच !

राजकीय सत्ता समविचारी नसेल तर, त्यांचे सर्वच निर्णय चूक, अशी धारणा मनात धरणे, हे सर्वस्वी चूक असते; परंतु, विरोधात असणाऱ्या पक्षांची मानसिकता नेहमी याच पठडीतील दिसते. केंद्र शासनाने नुकतेच १६ वर्षांखालील मुला-मुलींना म्हणजे विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस ला प्रवेश देण्यावर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात विरोधी पक्षातील काही नेते तुटून पडले. वास्तविक, कोचिंग क्लासेस महाराष्ट्रातच काय तर, देशभरात लुटीची केंद्र बनली आहेत. सोळा वर्षे म्हणजे दहावी पर्यंतच्या कोचिंग क्लासेसवर ही बंदी थेट दिसते, त्याचे आम्ही स्वागत करतो. कोचिंग संस्कृती निर्माण झाल्यापासून शाळेतील शिक्षक फारच बेफिकीर झाले आहेत. वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचे असते, ही बाब तर त्यांच्या विस्मरणात गेली आहे. बऱ्याच शाळांमधील शिक्षक एका बाजूला लाखाचा गलेलठ्ठ पगार घेतात आणि दुसऱ्या बाजूला कोचिंग क्लासेस मध्येही शिकवायला जातात. किंबहुना, असं म्हणणं अधिक उचित ठरेल की, शिक्षक शाळेत फक्त पगार घेतात आणि शिकवतात फक्त कोचिंग क्लासेस मध्ये. काही वर्षे कोचिंग मध्ये शिकवून त्या शिक्षकांचाच आणखी कोचिंग क्लास सुरू होतो. असा कोचिंग क्लास सुरू करताना संबंधित शिक्षक आपण ज्या शिक्षण संस्थेत नोकरी करतो, त्यांची परवानगी घेणे देखील महत्वाचे समजत नाही. कारण, इथे एक अर्थकारण सुरू होते. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कोचिंग ला प्रवेश घेतला असेल, त्या शाळेचे कोचिंग’ शी अर्थपूर्ण संबंध बनतात. वर्गात शिकवायचे नाही. यातून विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होण्याऐवजी शाळेत जाण्याची टाळाटाळ सुरू होते. कारण, वर्गात शिकवले जात नाही; आणि कोचिंग लावलेले मित्र वर्गात येत नाही. या दुष्टचक्राबरोबरच ” कोचिंग चा सक्सेस रेट” दाखवला जातो.‌ यातून ज्यांना कोचिंग लावणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. न्यूनगंडातून निराशा आणि निराशेतून शाळा सोडण्यापर्यंत हे दुष्टचक्र येऊन ठेपते. गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रासह देशाला ग्रासणाऱ्या या विषयापासून विद्यार्थी आणि पालक यांची सुटका होतेय, म्हणून आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. केंद्रातील मोदी सरकार विषयांना थेट भिडण्याचे जे साहस दाखवते त्यातूनच हे शक्य झाले आहे. सर्वसामान्य पालक ज्यांचे जगणे मोलमजुरी करून होते, त्यांच्या मुलांना लाखात फी असणारे कोचिंग क्लास न परवडणारेच. कोचिंग क्लासेस चे प्रस्थ एवढे वाढले की, त्यांची एक लाॅबी सक्रिय झाली आहे. सरकारच्या निर्णयाला थेट विरोध न करता लाॅबिंग करून निर्णय बदलायला भाग पाडणारी लाॅबी म्हणून आता कोचिंग क्लासेस लाॅबी ओळखली जाते. अर्थात, वैद्यकीय अभ्यासक्रम, अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह सर्वच प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी चालविले जाणारे कोचिंग क्लास हद्दपार करायला हवेत. कारण, अशा क्लासेसमध्ये गेलो नाही, तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आपण पासच होवू शकत नाही, असा न्यूनगंड लाखो विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होवून ते क्षमता असूनही निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. महाराष्ट्राला बऱ्यापैकी आठवते की, अगदी सुरवातीलाच महाराष्ट्रात जाहीरातीच्या आधारे गाजावाजा झालेला कोचिंग क्लास सुरू झाला होता. या क्लासच्या संचालकांचे संबंध थेट राज्याच्या एका दिवंगत राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ठ जुळलेले होते. नंतर त्या क्लासचा संचालक चित्रपट निर्मितीतही आला होता. शिक्षकांना ज्ञानाचे सोडून पैशाचे वेड लावणारे हे कोचिंग क्लास नरेंद्र मोदी सरकारने बंद केले ही चांगली कामगिरी केली. 

COMMENTS