Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे वाकडी गावात स्वागत

राहाता ः श्री श्रेत्र वाकडी येथे सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात आले.श्रावण महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने खंडोबा दे

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी सामूहिक प्रयत्नानांची गरज
सिव्हीलच्या आगीचे कारण…शासनच करणार स्पष्ट
पेशवेकालीन बालाजी मंदिराचा होणार जीर्णोध्दार ; नगर अर्बन बँक चौकात भूमिपूजन उत्साहात

राहाता ः श्री श्रेत्र वाकडी येथे सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात आले.श्रावण महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने खंडोबा देवाचा भंडारा या दिवशी असतो. सराला बेटाचे प्रमुख महंत परंपरेने या श्रावणातील शेवटच्या दिवशी वाकडी येथे येवुन प्रवचन करतात. महंत रामगिरी महाराजांनी प्रवचन करत शेकडो भाविकांनी उद्बोधन केले.
तत्पूर्वी महंत रामगिरी महाराज याचें भव्य स्वागत करण्यात आले. वाकडी फाटा ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तेथुन हनुमान मंदिरा पर्यत लेझिम पथक व भजनी मंडळा समवेत स्वागत मिरवूणक काढण्यात आली. या मिरवणूकीत भजनी मंडळ, सुनिल महाराज कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली  बाल भजनी मंडळ, श्री लक्ष्मी नारायण विद्यालयाचे लेझिम पथक, ढोल ताश्यांच्या निनादात फुलांची उधळण आणि महिला पुरुष यांची मिरणूकीत गर्दी, भगव्या पतकांचा डामडौल अशा मंगल मय वातावरणात ही मिरवणू काढण्यात आली. वाकडी गावाच्या वेशीत चार जेसीबींनी फुलांची उधळण महंत रामगिरी महाराजांवर करण्यात आली. खंडोबा मंदिरात महाराजांच्या हस्ते खंडोबा देवाचे पुजन करून भंडारा वाहाण्यात आला. त्यानंतर महाराजांनी प्रवचन सेवा दिली. या प्रवचन प्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवचनात तेषां सततयुक्तानां, भजतां प्रीतिपूर्वकम्। ददामि बुध्दियोगं तं येन मामुपयान्ति ते॥ श्रीमदभगवतगितेतील दहाव्या अध्यायातील दहाव्या श्‍लोकावर महाराजांनी प्रवचन केले. जो भक्त भगवंताचे ध्यान करतो, ध्यानात मग्न असतो, प्रेमाने भजन करतो, अशा भक्तांना भगवंत तत्वज्ञान रुप योग प्राप्त करुन देतो, की ज्यामुळे तो मलाच प्राप्त होतो. महाराजांनी भक्तांचा चार प्रकार यावेळी भाविकांना सांगितले. चार मुलांचा दृष्टांतही त्यांनी सांगितला. भक्तीचे आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु आणि ज्ञानी असे चार प्रकार सांगितले. त्याचे वर्णन दाखले देत करत महाराज म्हणाले, धर्मराज द्युत खेळले, आताही काही जण पत्ते खेळतात, सोरट खेळतात! ही चांगली गोष्ट नाही. त्यापेक्षा हरिपाठ म्हणा, माणसाला ज्या विषयाची गोडी लागते ती सुटत नाही. तशी मनाला भगवंताची गोडी लागली तर ती सुटत नाही. आपली संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. संपुर्ण जगाला आपली संस्कृती मार्गदर्शक आहे, असेही महंत रामगिरीजी महाराज म्हणाले. यावेळी वाकडी गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS