Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘वेलकम 3’ मुन्नाभाई-सर्किटची होणार चित्रपटात एन्ट्री ?

बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हेरा फेरी'. परेश रावल , अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीने 'हेरा फेरी' मधून प्

कराड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड कामगाराचा मुुलगा ठार
मिस इंडिया रायझिंग स्टार 2023 अ‍ॅट ताज किताबने सातारची कु. स्नेहल चांगण सन्मानीत
सौरऊर्जेत भारताने गाठला 100 गिगावॅट क्षमतेचा टप्पा

बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘हेरा फेरी’. परेश रावल , अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीने ‘हेरा फेरी’ मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसवले. आता लवकरच सिनेमाचा तिसरा भाग सुद्धा येणार आहे. ‘हेरा फेरी ३’ च्या शूटिंग सुरुवात झाल्याची माहिती मेकर्सने दिली आहे. विशेष म्हणजे, अक्षय कुमारच ‘राजू’ ची भूमिका साकारेल हेही स्पष्ट झाले आहे. एकीकडे हेरा फेरी ३ च्या शुटींगला सुरुवात झाली असतानाच, वेलकम, वेलकम बॅकनंतर आता वेलकम चित्रपटाचाही तिसरा भाग लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकरच्या मजनूभाई पासून ते आरडीएक्सपर्यंतच्या पात्रांनी गाजवलेला चित्रपट म्हणजे वेलकम. २००७ साली आलेल्या वेलकमचा सिक्वल २०१५ मध्ये चाहत्यांना आवडला.

आता वेलकम ३ ची तयारी निर्माते आणि दिग्दर्शकाकडून सुरू करण्यात आलीय. ‘वेलकम टू द जंगल’ असं या सिनेमाचं नाव असून यामध्ये अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि संजय दत्त ही स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. फिरोज नाडियावाला या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून वेलकम ३ असंच या चित्रपटाचं नाव निश्चित झाल्याचं समजतं. यात मुन्नाभाई व सर्किट म्हणजे संजय दत्त आणि अर्शद वारसीही कॉमेडी करतील. हेराफेरी ३ चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतरच वेलकम ३ चित्रपटाचे शुटींग सुरू होणार आहे. त्यामुळे, एकापाठोपाठ एक असे २ कॉमेडी चित्रपट घेऊन खिलाडीकुमार चाहत्यांच्या भेटीला येतोय.

COMMENTS