बेलापूर/प्रतिनिधी ः केवळ नोटांमधून श्रीमंती ठरत नाही, तर आपले कार्य, तसेच संकटात किती लोक अश्रू पुसायला येतात, त्यावर आपली श्रीमंती ठरत असते. ज्य
बेलापूर/प्रतिनिधी ः केवळ नोटांमधून श्रीमंती ठरत नाही, तर आपले कार्य, तसेच संकटात किती लोक अश्रू पुसायला येतात, त्यावर आपली श्रीमंती ठरत असते. ज्यांनी पैशाबरोबर त्याहून अधिक माणसे कमावली, ती माणसे खर्या अर्थाने भाग्यवान समजली जातात, असे प्रतिपादन वाणीभूषण ह.भ. प. पारस महाराज मुथा यांनी केले.
येथील जनसेवा सहकारी पतसंस्थेच्या 21 व्या वर्धापन सभासदांच्या सभासदांच्या मेळाव्यात मुथा महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ भाजप नेते हेरंब आवटी होते, तर सुप्रसिद्ध उद्योजक किशोर निर्मळ, उत्तर नगर जिल्हा संघटक भरतराव निमसे, सहकार उपनिबंधक संदीप रुद्राक्ष, आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुथा महाराज पुढे म्हणाले की, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुवालाल लुंकड यांनी समाजाचा पैसा समाजासाठी खर्च करून एक नवा आदर्श जोपासित परमार्थात परमोच्च आनंद मानला. आपल्या कार्यात नम्रता निष्ठा नैतिकता आणि निरपेक्षता असेल तर हातून मोठ-मोठी कामे सहज होऊन जातात आणि त्यातूनच आपली खरी ओळख निर्माण होते. हे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे दाखले देत पटवून दिले. तर भरतराव निमसे म्हणाले की, संघ काय काम करतो हे पाहण्यासाठी स्वयंसेवक सुवालाल लुंकड यांना भेटा. असे सांगत जनसेवा पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या विविध अंगी सामाजिक कार्याचा त्यांनी गौरव केला. यावेळी संस्थेचे गत वीस वर्षात केलेल्या वाटचालीत पूर्णत्वास नेलेल्या एक कोटी 20 लाख खर्चाच्या विविध कामाचा आढावा दर्शक प्रवास जनसेवेचा या कार्यपुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
तत्पूर्वी विविध सामाजिक संस्था, पत्रकार संघाने सुवालाल लुंकड यांचा कृतज्ञतापूर्वक नाही केला. सर्वश्री शशिकांत कडुस्कर, सहकारी उपनिबंधक संदीप रुद्राक्ष, रणजीत श्रीगोड, यांची भाषणे झाली सुवालाल लुक्कड यांनी प्रास्ताविक तर विद्यमान चेअरमन प्रवीण लुंकड व व्यवस्थापक राहुल दायमा यांनी संस्थेची माहिती सांगितली. यावेळी सर्वश्री पत्रकार रमेश कोठारी, रमेश गुंदेच्या, हेमंत खाबिया, समदडिया, अशोकराव साळुंखे ,गणपतलाल मुथा, एडवोकेट शरद सोमानी, कणजी शेठ टाक ,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे, वकील संघाचे अध्यक्ष विजयकुमार साळुंखे, माजी सरपंच भरत साळुंखे, आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते,संस्थेचे चेअरमन प्रवीण लुंकड व्हाईस चेअरमन प्रकाशचंद कोठारी, संचालक अमित लुंकड, दीपक वैष्णव योगेश कोठारी, विक्रम हरकुट, सुनील शेजुळ, मनोज कांबळे एडवोकेट सुरेशचंद्र भाटिया .सौ नंदाताई खंडागळे, सौ सुवर्णा मुंडलिक, यांच्यासह सर्व सेवक व्रुन्दांनी मेळावा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संचालक अमित लुंकड यांनी केले. स्नेहभोजनाने मेळाव्याचा समारोप झाला. यावेळी मोठ्या संख्येने सभासद खातेदार व नागरिक उपस्थित होते.
COMMENTS