Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणिकदौंडी परिसरात सुविधा देण्यासाठी प्रयत्न करू : चंद्रशेखर घुले

पाथर्डी ः मला विधानसभेत काम करण्याची संधी दिल्यानंतर विकासकामे केली अद्याप देखील अनेक सोयी सुविधांपासून माणिकदौंडी परिसर वंचित असून मूलभूत सुविधा

नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प उभारणार: पालकमंत्री विखे
सोमैया महाविद्यालयात राष्ट्रपिता व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात
“अपने 2′ ला संगीत देणार हिमेश रेशमिया l पहा LokNews24

पाथर्डी ः मला विधानसभेत काम करण्याची संधी दिल्यानंतर विकासकामे केली अद्याप देखील अनेक सोयी सुविधांपासून माणिकदौंडी परिसर वंचित असून मूलभूत सुविधा सह आजच्या युगातील आधुनिक सेवा येथील नागरिकांना मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करू यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.
ते तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील चेकेवाडी, आल्हनवाडी, काकडदरा तांडा, सत्रे वस्ती, खरात वस्ती आदी ठिकाणी भेटी देऊन घुले पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब ताठे, चांद मणियार, उत्तम पवार, सचिन पवार, साहेबराव चव्हाण, अंकुश पवार, विष्णू पवार, सुरेश पवार, राम पवार, साहेबराव पवार, गोविंद राठोड, रामेश्‍वर कर्डिले, मच्छिंद्र पवार, दिगंबर पवार, दत्तात्रय पवार, विठ्ठल पवार, श्याम पवार, बाळू पवार, मुरलीधर भगत आदी उपस्थित होते. यावेळी विविध गावच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या काही वर्षात विकास कामे ठप्प झाली आहेत. यामुळे आम्हाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी आपण या भागातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह घुले पाटील यांना केला. पुढे बोलताना घुले पाटील म्हणाले की, दिवसेंदिवस जागतिक स्तरावर अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत. मात्र या परिसरातील नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही मूलभूत सेवा सुविधा पासून हा भाग अद्यापही वंचित आहे. माझ्या आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळामध्ये वीज, पाणी, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून विकास कामाचा पाया रचला.यानंतर मात्र माणिकदौंडी परिसरात काही भरीव काम झालेले दिसत नाही. आगामी काळात आपण सर्वांनी साथ द्यावी विकास कामाच्या माध्यमातून या परिसरातील चेहरा मोहरा बदलण्याचे काम आपण करू असे घुले पाटील म्हणाले.

COMMENTS