वाच्याळ वीरांना व पक्षाला हद्दपार करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू – दिलीपकुमार सानंदा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 वाच्याळ वीरांना व पक्षाला हद्दपार करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू – दिलीपकुमार सानंदा

  बुलढाणा प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच

पेटत्या सुटकेसमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह | LokNews24
ज्ञानाची, देवाची दारे उघडतांना …
पोटनिवडणुकीचा घोळ

  बुलढाणा प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, व भाजपाचे नेते सातत्याने चुकीचे वक्तव्य करून त्यांचा व महाराष्ट्राचा घोर अपमान करीत आहेत याचाच निषेध व्यक्त करण्यासाठी आज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले आहे.राज्यातील शिंदे-फडणवीस ईडी सरकारवर जनतेचा तिळमात्र विश्वास राहिलेला नसल्याने महाराष्ट्राच्या सिमालगत असलेली अनेक गावे बाजूच्या राज्यात जाण्याची भाषा बोलत आहे. हे अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे. या संदर्भात राज्यसरकारची स्पष्ट भुमिका दिसून येत नसल्याने राज्यातील जनतेच्या मनात तिव्र आक्रोश निर्माण झालेला आहे. तसेच काही दिवसां अगोदर भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल अपवादात्मक प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी खामगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. अशा वाचाळ विचारांच्या चंद्रकांत पाटलांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अन्यथा वेळप्रसंगी काँग्रेसकडून गाव बंद किंवा रस्त्यावर उतरून त्या वाच्याळवीरांसाठी यावरून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा दिला आहे.

COMMENTS