Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंभोरेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू -आ. खताळ

।संगमनेर : तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे करा

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन;
पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचा तालुक्यात बोजवारा
PHOTO-2025-04-08-16-26-57.jpg

।संगमनेर : तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे करांना दिला. संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील अखंड हरिनाम सप्ताह आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली. त्यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने आ.  खताळ पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे प्रश्न अत्यंत गंभीर झाले असल्याचे नागरिकांनी आ.अमोल खताळ यांचे निदर्शनास आणून दिले. 

यापुढे अंभोरे गावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व मी नेहमी कटीबद्ध राहील, अध्यात्मिक, सामाजिक, कृषी अशा सर्वच क्षेत्रातील विविध कामे मार्गी लावणार आहेत असे असे आश्वासन दिले. याप्रसंगी संपत गोविंद खेमनर, अनिल शिवराम खेमनर,अँड.संदीप जगनर, शिवाजी खेमनर, रावसाहेब रावजी, सोपान राधू खेमनर, उमा मारुती खेमनर, बाबु राव गवाजी खेमनर, नागेश भास्कर हळनर, देवराम पुणेकर, रमेश बलसाने, नकाजी कडनर, दीपक कडनर, यांच्या सह सर्व ग्रामस्थ भजनीं मंडळ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS