मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तंद्री आम्ही उतरवणार – आ. गणेश नाईक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तंद्री आम्ही उतरवणार – आ. गणेश नाईक

नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील आयोजित एका बैठकीत गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले, विषय होता सिडकोने मुंबई पालिकेच्

शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या
युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होवून लोकशाही बळकट करावी : शेखर सिंह
बिल्कीस बानो प्रकरणातून न्या. बेला त्रिवेदींची माघार

नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील आयोजित एका बैठकीत गणेश नाईक पालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले, विषय होता सिडकोने मुंबई पालिकेच्या परिवहन सेवेच्या धर्तीवर 1974 ला बस सेवा सुरू केली होती, मात्र 12 वर्षा नंतर ही सेवा अचानक बंद पडली 1574 कामगार बेरोजगार झाल्याने त्यांना शंभर चौरस फुटांचे व्यवसायिक गाळे देण्याचा ठराव सिडकोने घेतला. मात्र आजही कामगारांना ते गाळे मिळाले नाहीत, ते मिळावेत म्हणून गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे पालिकेतही काही अधिकारी मनमानी करत असून, त्यांनी वेळीच आवर घालावा आमचा नातेवाईक कुणीतरी आमदार, मंत्री, मोठा अधिकारी आहे, या अविर्भावात राहू नये, त्यांची तंद्री आम्ही उतरवू आणि जर कुणी अधिकारी आपल्या नातेवाईकांना पालिकेचे कॉन्ट्रॅक्ट देत असेल त्यांची चौकशी करून कारवाई होणार असा सज्जड दम आमदार गणेश नाईक यांनी भरला. 

COMMENTS