Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भागातील विकासकामे दर्जेदार करू-अमरसिंह पंडित

गेवराई - ग्रामीण भागाला पाणी रस्ते आरोग्य अशा विविध सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. गेवराई विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामासाठी कोट

जयभवानी यंदा सात लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करणार-अमरसिंह पंडित
धनंजय मुंडेंच्या कृषीमंत्री पदाचा लाभ सामान्य शेतकर्‍यांना मिळेल-अमरसिंह पंडित
जयभवानी ऊसाला 2700 रू पेक्षा जास्तीचा भाव देईल-अमरसिंह पंडित

गेवराई – ग्रामीण भागाला पाणी रस्ते आरोग्य अशा विविध सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. गेवराई विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी खेचून आणला, यापुढील काळातही विकास कामे बंद पडू दिले जाणार नाहीत तर दर्जेदार विकास कामे करण्यासाठी जातीने लक्ष दिले जाईल असे प्रतिपादन जयभवानी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. माटेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या विशेष प्रयत्नातुन मौजे माटेगांव येथे 2 कोटी 18 लक्ष रुपये किंमतीच्या विकास कामाचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयभवानी कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, माजी जि.प. सदस्य फुलचंद बोरकर, डॉ. विजयकुमार घाडगे, संग्राम आहेर, पं.स. सदस्य परमेश्वर खरात, शेख तय्यबभाई यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणीपुरवठा योजना (95 लक्ष रुपये), मग्रारोहियो अंतर्गत सिमेंट रस्ते ( 50 लक्ष रुपये), घनकचरा व्यवस्थापन बंदिस्त नाली (36 लक्ष रुपये) त्येबाशिर्ष 2515 अंतर्गत स्मशानभुमी सुशोभिकरण करणे (15 लक्ष रुपये ), लेखाशिर्ष 2515 अंतर्गत यादव वस्ती सिमेंट रस्ता करणे ( 15 लक्ष रुपये), समाजमंदिर बांधकाम करणे (7 लक्ष रुपये) अशा एकूण 2 कोटी 18 लक्ष रुपये किंमतीच्या विकासकामांचा अमरसिंह पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी माटेगाव आणि परिसरातील ग्रामस्थांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS