Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भाचा अनुशेष भरून काढू – मुख्यमंत्री शिंदे

कोरोना, लॉकउाऊन त्यांचा आवडता विषय म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचले

नागपूर/प्रतिनिधी ः हिवाळी अधिवेशनाचे आज शुक्रवारी सूप वाजणार असले तरी, गुरुवारी मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. य

सावरकरांचा जन्मदिवस ’स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून होणार साजरा
राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाभियान राबवणार
राज्यात 2 लाख 76 हजार कोटींची गुंतवणूक

नागपूर/प्रतिनिधी ः हिवाळी अधिवेशनाचे आज शुक्रवारी सूप वाजणार असले तरी, गुरुवारी मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलतांना म्हणाले मराठवाडा, विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. आम्हाला आमची जबाबदारी पूर्ण माहीत आहे. काम करताना याचा आम्हाला फायदा होईल. मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे किती काळ होते हे सर्वांना माहीत आहे. विदर्भाला मुख्यमंत्रीपद किती काळ होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने विदर्भाचा अनुशेष दुर करण्यासाठी मविआला न्याय देता आला असता. मात्र आम्ही विदर्भ आणि मराठवाडयाचा अनुशेष भरून काढू अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

सरकार बदलले नसते तर विदर्भात अधिवेशन झाले नसते. चायना, कोरीया जपानमध्ये कोरोना सुरु झाला, तो निकष जर आपल्याकडे लावून विदर्भात अधिवेशन घेतले नसते. अजित पवारांना माहीत आहे की, कोविड आणि लॉकडाऊन कुणाचा आवडता विषय आहे असे खोचक वक्तव्य करुन मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. समृद्धी महामार्ग विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या महामार्गाच्या उद्घाटनावरुन विरोधकांनी वाद घातला. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे हा महामार्ग होऊ नये त्यासाठी शेतकर्‍यांना जमीनी देऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विदर्भाच्या बाबतीत सर्वांनाच संवेदना असावी. विदर्भाला काहीतरी द्यायला हवे. कालबद्ध पाऊले टाकण्याची इच्छाशक्ती हवी. सरकार म्हणून जबाबदारी पाळणार व काही तरी ठोस निर्णय घ्यायचे आहेत. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत. विदर्भाच्या संपूर्ण विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांना 2004 मध्ये मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, संधी असतानाही शरद पवार यांनी अजित दादांना मुख्यमंत्री केले नाही, असा टोला गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हाणला. फडणवीस म्हणाले, आम्ही विदर्भाच्या विकासासाठी अनेक योजना मार्गी लावल्यात. अनेक उद्योग आणलेत. विदर्भात मदर डेअरी प्रकल्प सुरू केला. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलाला मिळाला. विदर्भात पतंजलीचा प्रकल्प जानेवारी महिन्यात सुरू होतोय.

चौकशी होईपर्यंत सत्तारांचा राजीनामा घ्या ः अजित पवार
गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 29 जुलै 2019 रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खासगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. सातत्याने या घटना घडत आहेत. एक महिन्याच्या आत पाच एकर जागा नियमित करावी, असे लेखी आदेश दिले आहेत. हे नियमाला धरून नाही. जमिनीचे नियमबाह्य वाटप झाले आहे. कदाचित आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा थेट आरोपही अजित पवार यांनी केला. अजित पवार म्हणाले, अशी प्रकरणे सातत्याने समोर येत असून या सर्वप्रकरणी महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांमार्फत संधान साधून जमीन वाटपाची कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे, अशी मागणी देखील पवार यांनी केली.

COMMENTS