Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे खासदार अमोल कोल्हेंना आव्हान

पुणे ः शिरूर मतदारसंघात लोकसभेेचे वारे जोरात वाहतांना दिसून येत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर या लोकसभा मतदारसंघातून आमचाच उमेदवार नि

बोगस खते, बियाणे विकणार्‍यांवर कठोर कारवाई
मार्डच्या मागण्यांवर कॅबिनेटमध्ये निर्णय होणार
कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक

पुणे ः शिरूर मतदारसंघात लोकसभेेचे वारे जोरात वाहतांना दिसून येत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर या लोकसभा मतदारसंघातून आमचाच उमेदवार निवडणून आणू असे सांगत विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना आव्हान दिले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे पदयात्रा काढणार आहेत. यासंबंधीचा प्रश्‍न अजित पवारांना विचारला असता त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. निवडून आल्यानंतर दीड वर्षातच त्यांनी (कोल्हे) राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. आता निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांना पदयात्रा सूचत आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. शिरुरच्या खासदाराने पाच वर्ष स्वतःच्या मतदारसंघात लक्ष दिले असते तर खूप बरे झाले असते. त्या खासदारांनी दीड वर्षापूर्वी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचे रान केलेले होते. त्यांना खासगीत समोरासमोर बोलवा, मग आम्ही काय ते सांगू. ते मधल्या काळात त्यांच्या लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघात फिरकतही नव्हते. तसेच त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती. मी एक कलावंत असून माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा फ्लॉप गेला. माझ्या कुटुंबावर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्याचे या खासदारांनी आम्हाला सांगितले होते. मी हे कधी बोलणार नव्हतो. पण निवडणूक आल्यामुळे त्यांना एक एक गोष्टी सुचायला लागल्या आहेत. त्यामुळे बोलायला लागत आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.

माझे बंड नव्हतेच ः खा. शरद पवार- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे बोलत असताना शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्याविरोधात केलेल्या बंडाची आठवण सांगितली. त्यावेळी शरद पवारांचे वय केवळ 38 वर्षांचे होते. माझे वय आता साठीच्या पलीकडे आहे, असे ते म्हणाले होते. या प्रश्‍नावर शरद पवार यांनी बारामती येथे बोलत असताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझे बंड नव्हतेच. आमच्या काळात आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन आम्ही तो निर्णय घेतला होता. आता कुणी काय केले असेल तर त्यावरही आपली कोणती तक्रार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच आज कुणी काही केले असेल तर त्यावरही तक्रार करण्याची गरज नाही. पक्षाची निर्मिती कशी झाली? पक्षाचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना ठावूक आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची काहीच गरज नाही.

COMMENTS