Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांप्रमाणे नीतीयुक्ती वापरली पाहिजे : डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर : १६३० ते१६८० या कालाखंडातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. परकीय अन्यायी प्रवृत्ती विरुद्ध लढणारे

अकोल्यात अतिक्रमणप्रकरणी समशेरपूरचे ग्रामपंचायत सदस्य अपात्र
भाजपला लोकांनी सकशेप नाकारायला सुरुवात केली आहे –  कुणाल पाटील 
भूमाता फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम महिलांना साडी वाटप

श्रीरामपूर : १६३० ते१६८० या कालाखंडातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. परकीय अन्यायी प्रवृत्ती विरुद्ध लढणारे ते नीतीमान जाणते राजे होते. त्यांची देशभक्ती,धर्मशक्ती आणि नीतीयुक्ती आजच्या जीवन प्रणालीत वापरली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन इंग्लिश मेडियम कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श या विषयावर बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. खजिनदार डॉ. राजीव शिंदे, उपाध्यक्षा डॉ. सौ. प्रेरणा शिंदे, प्राचार्य योगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात प्रा. नीतीन महाडिक यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी१६-१७ व्या शतकातील महाराष्ट्र आणि देशाच्या राजवटीचे संदर्भ सांगत या कालखंडात शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य कसे आणि कशासाठी आकाराला आणले त्यासंदर्भाने विवेचन केले. राजमाता जिजाऊंचे संस्कार, मार्गदर्शन आणि नेतृत्व यामुळे छत्रपती शिवरायांना जीवनदिशा मिळाली. जेव्हा कोणीच पाठीराखे नव्हते तेव्हा सर्वसामान्य कष्टकरी, डोंगरदऱ्यातील मावळे शिवरायांबरोबर होते. १५ व्या वर्षी रोहिडेश्वरांच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन त्यांनी औरंगजेबी अत्याचारी राजवटीला जेरीस आणले.१६७४ ला राज्याभिषेक झाला, मराठी माणसाला माणुसकीसंपन्न राजा मिळाला, आज असे जाणते राजे निर्माण झाले पाहिजेत,अशी अपेक्षा व्यक्त केली प्राचार्य टी.ई. शेळके यांनी प्रारंभी डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या खडतर जीवन वाटचालीचे दाखले देत विद्यार्थ्यांनी भूतकाळ आणि इतिहासातून काही जीवनपैलू घेतले पाहिजे. छत्रपती शिवरायांचे सर्वांभूती प्रेम आणि अन्यायी वृत्तीला विरोध हे जीवनसूत्र समजून घेतले पाहिजे. इतिहास पुसण्यापेक्षा तो निर्माण करण्यात मर्दुमकी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थीनी कु. सिद्धी भगत यांनी आपल्या मनोगतातून असेच साहित्यिक आणि संस्कारी व्याख्याने व्हावीत असे सांगून आभार मानले.

COMMENTS