जळगाव प्रतिनिधी - शिवसेना कुणाची यावरुन जो येतो तो आमच्यावर बोलतो. पण शिवसेना आमचीच आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही काय कमळावर विजयी झालो का?
जळगाव प्रतिनिधी – शिवसेना कुणाची यावरुन जो येतो तो आमच्यावर बोलतो. पण शिवसेना आमचीच आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही काय कमळावर विजयी झालो का? असा सवाल उपस्थित करत ज्यांच्यासोबत आमचं २५ वर्ष लफडं होतं, त्याला आम्ही आय लव्ह यू म्हटलं, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी जोरदार फटकेबाजी केली. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी इथं जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली.
COMMENTS