Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणार – आ. चंद्रकांत पाटील 

जळगाव प्रतिनिधी - मतदारांना पैसे देण्याच्या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, खोके कोण वाटतंय? आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणा

कोल्हापूर : आयटी पार्कचा शासन निर्णय काढणार – उद्योग मंत्री उदय सामंत
तापी नदीवरील पूल कोसळला
शाहू महाराजांमुळे संभाजीराजे छत्रपती यांची माघार

जळगाव प्रतिनिधी – मतदारांना पैसे देण्याच्या आरोपावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, खोके कोण वाटतंय? आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणार, पैसे देणारे तर समोर प्रस्थापित आहेत. उद्याचा निकाल स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसतोय आणि पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून एकनाथराव खडसे आरोप करत आहेत. बहुमताने परिवर्तन होईल आणि आमचाच पॅनल विजयी होईल, असा विश्वास मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

असा एखादा विडिओ दाखवा, अशी घटना कुठेही घडलेली नाही. मी आमदार असून मतदान केंद्रापासून कुठे बसलो ते पाहा व खडसे यांचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या कुठे आहेत ते पाहा व मतदान केंद्रात कोण फिरतंय ते पाहा आणि कायदा सुव्यवस्थेचा कोण दुरुपयोग करत आहे याची माहिती घेतलेलीच बरी, असा प्रतिटोला आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना लगावला आहे.

COMMENTS