Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड कर्जतमध्ये प्रस्थापिताविरोधात आम्ही सर्व ः फडणवीस

प्रा. मधुकर राळेभात यांचा भाजपतच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश

जामखेड ः जामखेड कर्जत मतदारसंघात भाजपाची लढाई ही प्रस्थापिताविरोधात आहे.यासाठी राम शिंदे यांनी मोठा संघर्ष करत आहेत. आता आ प्रा.राम शिंदे यांच्या

गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य अशोभनीय ः फडणवीस
फडणवीसांचं वय पाहू नका… १०० अजित पवार ते खिशात घालून फिरतात…
Nawab Malik Live: अंडरवर्ल्डशी संबंध? मलिक म्हणतात ‘आ रहा हूँ मै’ | (Full Video)

जामखेड ः जामखेड कर्जत मतदारसंघात भाजपाची लढाई ही प्रस्थापिताविरोधात आहे.यासाठी राम शिंदे यांनी मोठा संघर्ष करत आहेत. आता आ प्रा.राम शिंदे यांच्या जोडीला प्रा मधुकर राळेभात व त्यांची मोठी टीम आली आहे. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला  कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ येत्या विधानसभा निवडणुकीत पून्हा भाजपकडे येणार आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे प्रा मधुकर राळेभात यांच्या जाहीर प्रवेशप्रसंगी केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आ रोहित पवार यांच्यावर मनमानी कारभाराचा व एकाधिकारशाहीचा आरोप करीत राष्ट्रवादीला सोडल्यानतरही  प्रा मधुकर राळेभात कोणत्या पक्षात जाणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते.  जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात, नगरसेवक मोहन पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काशीद यांच्यासह तालुक्यातील पाच सरपंच व पाच नगरसेवकांनी प्रा मधुकर राळेभात यांच्या बरोबर आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.हा आ रोहित पवार यांना मोठा धक्का मानला जातो. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसुलमंत्री राधाकृष्ण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आ सुरेश धस डॉ भगवान मुरुमकर, नगरसेवक अमित चिंतामणी, अमित जाधव, मोहन पवार, रवि सुरवसे बाजीराव गोपाळघरे, सोमनाथ पाचरणे, गोरख घनवट, पांडूरंग माने, शिवकुमार डोंगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मधुकर राळेभात म्हणाले की मी शिवसेनेमध्येही अनेक वर्षे काम केले. सेना भाजपा युती सरकारमध्ये शिवसेना तालुकाप्रमुखप्रमुख होतो. आ प्रा.राम शिंदे यांच्याबरोबर काम करण्याचा चांगला अनुभव आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलो. गेल्या निवडणुकीत फार मोठ्या भुलथांना बळी पडलो अन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना निवडून आणले. मात्र थोड्याच दिवसांत त्याची फसवी व जातीयवादी, मीच फार मोठा अशी हुकुमशाही ओळख समोर आली. आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा श्रेष्ठी जो उमेदवार देतील त्यांचे एक भाजपा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करीन.या प्रवेशाने कर्जत जामखेड मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

COMMENTS