Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मिळणार पाणी

राहुरीतील 21 गावांमध्ये उत्साहाचे वातावरण

राहुरी ः तब्बल 53 वर्षांच्या संघर्षमय काळानंतर निळवंडे धरणातून राहुरी तालुक्यात उजव्या कालव्याद्वारे पाणी प्रवेश होण्याचे संकेत प्राप्त झाले असून

वेटरची हत्या करणाऱ्या नामदेव मामाला अटक करण्यात राहुरी पोलीसांना अपयश
दहावीच्या परीक्षेत प्रवरेच्या 14 शाळाचा शंभर टक्के निकाल
सरकारने दुधाचे पाच रुपये अनुदान त्वरीत जमा करावे ः  संजय शिंदे

राहुरी ः तब्बल 53 वर्षांच्या संघर्षमय काळानंतर निळवंडे धरणातून राहुरी तालुक्यात उजव्या कालव्याद्वारे पाणी प्रवेश होण्याचे संकेत प्राप्त झाले असून निंभेरे, तांभेरे, कानडगाव सह 21 गावांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. निळवंडे धरणाचा इतिहास सर्वश्रुत असून निळवंड्याच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यातील खळपिंपरी येथील निळवंडे धरणाच्या उजव्या कॅनॉल अंतर्गत राहुरी तालुक्याला जोडणारा सुमारे तीन किलोमीटर चा बोगदा यापूर्वीच अथक परिश्रमाने जलसंपदा विभाग, राज्य शासन, स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आला आहे . काल सायंकाळपर्यंत या बोगद्याला निळवंड्याच्या पाण्याचा स्पर्श झालेला आहे. तर आज सकाळ राहुरी तालुक्यातील बोगद्या बाहेर पाणी झेपावणार आहे. हा नेत्र दीपक प्रसंग पाहण्यासाठी निंभेरे, तांभेरे, कानडगाव, कनगर सह 21 गावातील लाभधारक शेतकर्‍यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे . भजनी मंडळ, डीजे जेसीबीच्या साह्याने गुलालची उधळण ग्रामस्थ महिलांसह शेतकरी यांची या भागामध्ये जोरदार तयारी सुरू केलेली आहे  आज पहाटे येथील तीन किलोमीटर लांबीच्या बोगद्याबाहेर पाणी येताच जमलेल्या ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला. सकाळपर्यंत तुळापूर पर्यंत पाणी आलेले होते . येथून कानडगाव , तांदुळनेर , तांभेरे , वडनेर मार्गे कनगर पर्यंत पाणी पोहोचणार आहे. कनगर येथील वडाच्या लवनामध्ये निळवंडे च्या कॅनॉल मधील पाणी साठवण्यासाठी टेल टँक तयार करण्यात आला आहे. 34 वर्षांच्या संघर्षानंतर निळवंडे तून राहुरी तालुक्यात पाणी येत असल्याने मोठा राजकीय धुराळा पहावयास मिळणार आहे. सध्या 150 क्युसेकने सोडण्यात येणार्‍या पाण्यात वाढ करत 200 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

COMMENTS