वॉटर टॅक्सी सेवा सुरु ;  मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पहिल्या फेरीचे उद्घाटन 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वॉटर टॅक्सी सेवा सुरु ;  मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पहिल्या फेरीचे उद्घाटन 

नवी मुंबई प्रतिनिधी - बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आल

न भयं न लज्जा !
सांगलीत संविधान स्तंभाचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण
कुरूक्षेत्रात स्थापणार जगातील सर्वात मोठी गीता

नवी मुंबई प्रतिनिधी – बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडची ही वातानुकूलित वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईला – नवीमुंबईला  जोडणार आहे. आता बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सीमुळे प्रवाशांचा वेळ ही वाचेल आणि पैशांची बचत होणार आहे. गेटवे ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातील पाच दिवस धावणार आहे. तिकीट दर ३०० रुपये असणार आहे. बोटीमध्ये एकूण 200 प्रवाशी  घेऊन जाण्याची क्षमता असून वर आणि खाली अशा दोन्ही ठिकाणी प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच नोकरदारावर्गांना पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता या वॉटर टॅक्सीला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. 

COMMENTS