Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदरबझार परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली असल्याने सदरबझार परिसरात गेल्या चार दिवसापास

कर्मकांडांना फाटा देत महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधकी विचाराने रक्षाविसर्जन
चेतना सिन्हा यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
राजारामबापू साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकर्‍यांना फळझाडांचे वाटप

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली असल्याने सदरबझार परिसरात गेल्या चार दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. चार दिवसात एक पाईपालाईन जोडण्यास प्राधिकरणाला अपयश आले आहे. यामधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किती तत्पर कारभार करत असल्याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे.
मंगळवारी अचानक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात पाणी पुरवठा करणारी पाईप फुटल्याची चर्चा सुरु होती. मात्र, याकडे प्राधिकरणाच्या अधिकारी तसेच कर्मचार्‍यांनी डोळेझाक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. कारण त्यानंतर सातारा शहरातील उच्चभू वस्तीतील पाणी पुरवठा बंद पडल्याचे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अधिकारी तसेच संबंधित काम करणारे कामगार खडबडून जागे झाले. पाईपला लागलेली गळती शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना वेळ मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी घेतलेल्या सुट्टीची धुंदी मंगळवारपर्यंत उतरली नसल्याने असा ढिसाळ कारभार होत असल्याचा नागरिकांना प्रत्यय आला. मंगळवार ते गुुरुवार या चार दिवसाच्या कालावधीत एका पाईपची गळती काढता आली नाही.
सदरबझार परिसरात सर्व शासकिय निवासस्थाने तसेच जिल्हा परिषद, शासकिय विश्रामगृह, आरटीओ कार्यालय, बांधकाम भवन तसेच जिल्हा न्यायालयाचा पाणी पुरवठा विस्कळीत होवूनही यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे नागरिकांना पहायला मिळाले. तसेच या परिरात सातारा नगरपालिका शाळा तसेच उद्याने आहेत. मात्र, सातारा नगरपालिकेचा एकही अधिकारी या भागातील पाणी पुरवठ्याबाबत ब्र शब्द काढायला तयार नाही. इतर वेळी सातारा शहरातील एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या निवासस्थानाच्या परिसरात पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास अग्निशामक दलाच्या बंबाने पाणी पुरवठा करणारे पालिका प्रशासन फक्त कर वसूलीसाठीच तत्पर असल्याचे या माध्यमातून समोर आले आहे. पालिकेच्या लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने त्यांचा वावर ना पालिका ना प्रभाग असा झाला आहे. निवडणूका लागत नसल्याने बर्‍याचजणांनी विविध प्रभागात शक्ती प्रदर्शने केली. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदरबझारमधून कायम निवडूण येणार्‍या लोकप्रतिनिधींनी आता काय मौन वृत्त पाळले आहे की काय? असा सवाल जनता करू लागली आहे.

COMMENTS