Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत; नगरपरिषदेच्या दारात महिलांचे आंदोलन

फलटण / प्रतिनिधी : नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावर असणार्‍या मेटकरी गल्ली येथील महिलांनी ऐन सणासुदीत गेली चार वर्षांपासून पाणी पुरवठ्याच्या समस्य

पोलीस नाईकास लाच घेताना रंगेहाथ पकडले
एसटीच्या संपामुळे टीईटी परीक्षेस 1634 गैरहजर
ना. जयंत पाटील-आनंदराव रमजान ईद निमित्त एकत्र; राजकीय चर्चेला उधाण : तर…शिवसेनेचा नगराध्यक्ष?

फलटण / प्रतिनिधी : नगर परिषदेच्या हाकेच्या अंतरावर असणार्‍या मेटकरी गल्ली येथील महिलांनी ऐन सणासुदीत गेली चार वर्षांपासून पाणी पुरवठ्याच्या समस्येला कंटाळून हंडा कळशी घेऊन नगरपरिषदेच्या इमारतीच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर मुख्याधिकारी संजय गायकवाड नागरिकांचा नाराजीचा सूर पहाता आंदोलन मागे घेण्याची विनंती करत तत्काळ पुरवठा विभागास काम करण्याच्या सूचना दिल्या. पाणी प्रश्‍नी सुरू झालेल्या धरणे आंदोलनावर तात्पुरता पडदा पडला.
हंडा कळशी घेऊन महिलांचे आंदोलन..
अनेक वर्षांपासून नगरपरिषदेच्या लगत असणार्‍या मेटकरी गल्ली या ठिकाणी नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते. कमी दाबाने पाणी, पाणी न येणे, दूषित पाणी येणे, कमी दाबाने पाणी येणे, कमी वेळ पाणी येणे अशा अनेक पाणी विषयक समस्यांना याठिकाणी राहत असणारे नागरिक चांगलेच कंटाळले होते. वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही नगरपरिषदेकडे कोणतीही दखल घेत नसल्याने त्रासले होते.
मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनाही यापूर्वी प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदनाद्वारे पाणीप्रश्‍नी उपायोजना करण्याची विनंती नागरिकांनी केली होती. परंतू याकडे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दुर्लक्ष केल्याने गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी मेटकरी गल्ली येथील नागरिकांनी महिलांसह लहान मुलासह हंडा कळशी घेऊन नगरपरिषदेच्या इमारतीच्या खाली धरणे आंदोलन सुरु केले.
आंदोलनाच्या ठिकाणी महिला व पुरुष लहान मुलांसह आंदोलनाला बसले असल्याची माहिती मिळताच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात केली. मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना फोनवरून बोलून घेऊन पाणीप्रश्‍नी जाब विचारण्यास सुरुवात केली. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांची गर्दी पाहून मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी आंदोलन करणार्‍या नागरिकांना पाणी समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. याप्रसंगी उपस्थित महिलांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना चांगलेच धारेवर धरत प्रश्‍नांचा भडीमार केला.
यावेळी उपस्थित दिगंबर आगवणे, अमीर शेख, मेहबूब मेटकरी व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थाची भूमिका घेत मेटकरी गल्ली येथील नागरिकांना धरणे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मुख्याधिकार्‍यांनी पाणी समस्या सोडवण्यासाठी तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकारी पाणी पुरवठा विभागास सूचना दिल्या. त्यानंतर नागरिकांनी काही कालावधीसाठी धरणे आंदोलन मागे घेतले. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

COMMENTS