Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट ? 

मुंबई प्रतिनिधी - मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी अस

LiveNarendra Modi : मन कि बात
मुर्शिदाबादमध्ये 10 नवजात अर्भकांचा मृत्यू
जपानमध्ये पुन्हा 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप

मुंबई प्रतिनिधी – मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आणि  धरणातील सध्याची पाणीपातळी पाहता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट अटळ असण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडे पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करण्यासाठी विनंती करणार आहोत. मात्र, ती मान्य न झाल्यास आम्हाला काही काळासाठी पाणीकपात करावी लागल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. बदलत्या हवामानामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे ७ जूनपासून बरसणारा पाऊस आता लांबणीवर पडत आहे. गेल्या वर्षी पावसाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने १ जुलै २०२३ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसल्याने ८ ऑगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली होती.

COMMENTS