Homeअग्रलेख

अजितदादांचा अपघात की घातपात ?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तासंघर्ष नवा नाही. मात्र अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष आणि त्यांच्या

दादा, बेमूर्वत आणि अहंकाराचा फुगा फुटणारच!
टग्या नामोल्लेखाची सार्थकता !
माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तासंघर्ष नवा नाही. मात्र अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष आणि त्यांच्या अपघातावर होत असलेले भाष्य याकडे दुर्लक्ष करता येत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे विमान अपघातावर संशय निर्माण होत असून, तो घातपात असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले पाच प्रश्‍न महत्वाचे आहेत. कारण विमानात सहा व्यक्ती असल्याचा दावा केला होता, प्रत्यक्षात पाचच मृतदेह आढळून आले, मग सहावा कुठे गेला. त्यासोबतच जर दृश्यमानता नव्हती तर, सीसीटीव्ही कॅमेर्‍यात विमान कैद कसे झाले, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. त्याही पुढे जाऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे होते, कदातिच त्यासंदर्भातील फाईल्स ते बारामतीला सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असावे असा अंदाज देखील वर्तवला आहे, त्यामुळेच त्यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या कुटुंबांतून कुणीही अजून या अपघातावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केलेले नाही. किंबहूना खासदार शरद पवारांनी देखील स्वतः माध्यमासमोर येऊन हा अपघात असल्याचे स्पष्ट करत यावर राजकारण न करण्याचे आवाहन केले. त्यामुळे अजितदादांच्या अपघाताची सीआयडी चौकशी होणार असली तरी, अशा चौकश्यांचे पुढे काय होते, ते वेगळे सांगण्याची गरज नाही.
महाराष्ट्रामध्ये आजमितीस 31 विमानतळे असून, त्यापैकी 6 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. बारामती येथील विमानतळाची निर्मिती तब्बल 30 वर्षांपूर्वी म्हणजेच 1996 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रायोजित करून बांधणी केली होती. या विमानतळाची धावपट्टी छोटी आहे. तसेच याठिकाणी नियंत्रण कक्ष देखील नाही. त्यासोबतच गेल्या 30 वर्षांमध्ये या विमानतळामध्ये भरीव सुधारणा झालेल्या नाहीत. त्यामुळेच या विमानतळावर पहाटेच्या वेळी विमान उतरवणे तसे धोक्याचे. यासोबतच ज्या कंपनीचे विमान आहे, त्या कंपनीवर देखील यापूर्वीच म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले आहे. असे असतांना या विमानतळातून उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास म्हणजे यात नक्कीच शंकेला वाव आहे. त्यासोबतच ऐनवेळी विमानाचा पायलट बदलणे. म्हणजेच पहाटेच्या प्रवासावेळी जो पायलट नियोजित केला होता, तो वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचे बोलले जात आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईसारख्या कोणत्या भागात सकाळी सहा-सात वाजेच्या दरम्यान वाहतूक कोंडी असते, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ऐनवेळी पायलट बदलला, बरं जो पायलट आला ते 62 वर्षीय सुमीत मलिक, त्यांच्याकडून विमान अपघात होणे अपेक्षित नाही. असे असतांना मग या विमानात काही तांत्रिक बिघाड यापूर्वीच करून ठेवला होता का? विमान अपघातानंतर त्यात असलेल्या व्यक्तींच्या मृतदेह विखुरलेले होते, ते जळालेल्या अवस्थेत होते. मात्र त्याच माळरानावर विखुरलेले कागदपत्रे चांगल्या स्थितीत होते, ते कसे काय?  या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायमूर्तीच्या माध्यमातून चौकशी होण्याची गरज आहे.  खरंतर हा नैसर्गिक अपघात असेल, तर त्यामागे शंका घेण्याचे कारण नाही. मात्र या अपघातावर जे प्रश्‍न उपस्थित होत आहे, त्याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँगे्रसच्या विलीनीकरणाचा प्रश्‍न. एकीकडे अजितदादा आपल्या भाषणात सातत्याने माझ्या काकांच्या आशीवार्दाने माझं चांगलं सुरू आहे, माझा मोठा काका कसा आहे, तुम्हाला माहीत असे सांगून आपल्याला त्यांचा वरदहस्त असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत होते. मात्र अजितदादांच्या पश्‍चात त्यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसला खा. शरद पवार नको आहेत, किंबहूना त्यांच्या पक्षातील सर्वच आमदार आणि खासदारांनी विलीनीकरणाच्या अशा बैठका झाल्या होत्या, या चर्चा फेटाळून लावल्या. तर दुसरीकडे खा. शरद पवारांच्या पक्षातील आमदार आणि खासदारांनी पक्ष विलीनीकरणाच्या चर्चा अंतिम टप्प्यात होत्या, खुद्द शरद पवारांनीच 12 फेबु्रवारीला त्याची घोषणा होणार होती, असे वक्तव्य केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये, त्यासाठीच तर काही घातपात झाला नाही, या संपूर्ण बाबींची चौकशी होण्याची खरी गरज आहे. यासोबतच आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे महापालिका निवडणुकीत अजितदादांनी थेट भाजपवर कठोर टीका केली होती. त्या टीकेला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेख बावनकुळे, मंत्री आशीष शेलार या पहिल्या फळीतील नेत्यांनी येऊन अजितदादांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे अजितदादा जरी महायुतीत असले तरी, त्यांनी नागपूर अधिवेशनात संघाच्या मुख्यालयात जाणे आवर्जुन टाळले होते. यासोबतच त्यांनी विधानसभेत भाजपने दिलेल्या कटेंगे तो बटेंगे या नार्‍याचा समाचार घेत हा महाराष्ट्र शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा असल्याचे आक्रमक पद्धतीने मांडले होते. त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूनंतर आज ते सर्वांनाच आपल्या सोयीचे वाटत असले तरी, त्यांच्या भूमिकेने अनेकांची अडचण व्हायची. मात्र आपण ज्यांच्या सावलीत वाढलो, किंबहूना ज्यांनी आपल्याला मोठं केले, त्या आपल्या काका म्हणजेच शरद पवारांविषयी त्यांनी कधीही विद्रोहाची भाषा केली नाही. त्यामुळे आज अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांना आपल्या सोयीप्रमाणे ठरवण्याची घाई दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांकडून होत आहे. मात्र त्यांच्या विमान अपघाताची चर्चा झाली पाहिजे, जनतेतून उपस्थित झालेल्या प्रश्‍नांची उत्तरे मिळाली पाहिजे, हीच आमची माफक अपेक्षा.

COMMENTS