Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जायकवाडी वसाहतीवर बुलडोझर फिरण्याचा इशारा

10 वी, 12 वी परीक्षेच्या काळात घर रिक्त करण्याविरोधात नागरिकांची मागणीतलवाडा । प्रतिनिधीपाटबंधारे विभागाच्या जायकवाडी सिंचन वसाहतीमध्ये अनेक ठिकाण

राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल
संजय राऊतांची होणार शिवसेनेतून हकालपट्टी ?
मनसेने घातला महाविकास आघाडी सरकार पुतळ्यास दारूचा अभिषेक

10 वी, 12 वी परीक्षेच्या काळात घर रिक्त करण्याविरोधात नागरिकांची मागणी
तलवाडा । प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाच्या जायकवाडी सिंचन वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी अनेक जण अतिक्रमण करून राहात आहेत. या घरांवर बुलडोझर फिरवणार असल्याचे जायकवाडी सिंचन, जातेगाव शाखा क्रमांक 5 चे शाखाधिकारी नागेश एच. गट्टूवार यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
सध्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षा सुरू असून, कडाक्याची थंडीही आहे. अशावेळी घर रिक्त करून लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना बाहेर काढल्यास त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे या घरांना रिक्त करण्यासाठी काही दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्याची मागणी भाजपा नेते व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केली आहे. जायकवाडी सिंचन वसाहत ही मूळतः जायकवाडीतील कर्मचार्‍यांना राहण्यासाठी उभा करण्यात आली होती. मात्र, या घरे मूळ कर्मचार्‍यांना न देता, गेल्या अनेक वर्षांपासून इतर लोक आपले कुटुंब घेऊन येथे राहत आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून, काही ठिकाणी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे शाखाधिकारी नागेश गट्टूवार यांनी तात्काळ घर रिक्त करण्याचे पत्रक जारी केले आहे. परंतु, सध्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षा सुरू असल्यामुळे, मुलांना तसेच त्यांच्या पालकांना अचानक घर रिक्त करण्यास सांगणे शैक्षणिक तसेच सामाजिक दृष्ट्या हानिकारक ठरेल. नागरिकांनी याबाबत आपली व्यथा माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासमोर मांडली आहे. जायकवाडी वसाहत असलेल्या राक्षसभुवन, धोंडराई, बागपिंपळगाव, तलवाडा, जातेगाव आणि टाकरवन या परिसरातील नागरिकांनी असा इशारा दिला आहे की, घर रिक्त करण्याची वेळ वाढवली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास ते तयार आहेत. याबाबत तात्काळ दखल घेत, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी संबंधित विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, 10 वी व 12 वी परीक्षेच्या काळाचा तसेच थंडीचा विचार करून नागरिकांना काही दिवसांचा वेळ वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणावर पुढील चर्चा करण्यासाठी ते राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही भेट घेणार आहेत. सध्या या निर्णयामुळे संबंधित नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. घर रिक्त करणे किंवा रस्त्यावर येणार्‍या कुटुंबांबाबत प्रशासनाने विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे, असा नागरिकांचा विश्वास आहे.

COMMENTS