“त्या” गुरुजींच्या बदल्यांना यादीची प्रतीक्षा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“त्या” गुरुजींच्या बदल्यांना यादीची प्रतीक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी : जाण्या-येण्यास पुरेशी साधने नसलेल्या व अन्य आवश्यक सुविधाही कमी असलेल्या अवघड क्षेत्रातील गावांमधील शाळांमध्ये तीन वर्षे शिक्षण स

 निर्णय झाला  तोच दर बाजार समित्यांनीही द्यावा ः उत्तम पुणे
भगवान बाबाच्या नारळी सप्ताहाला पंकजा मुंडे राहणार उपस्थित
Parner : चित्रा वाघ यांची तहसीलदार देवरे यांना भेट ही आर्थिक देवाण-घेवाणीतून l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : जाण्या-येण्यास पुरेशी साधने नसलेल्या व अन्य आवश्यक सुविधाही कमी असलेल्या अवघड क्षेत्रातील गावांमधील शाळांमध्ये तीन वर्षे शिक्षण सेवा केलेल्या गुरुजी मंडळींना लवकरच दिलासा मिळणार आहे. या गुरुजींची बदली जिल्ह्याच्या अन्य भागात होणार आहे. मात्र, त्यासाठी आधी अवघड क्षेत्रातील गावे व शाळांच्या यादीची प्रतीक्षा आहे व जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे अशी यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. त्यामुळे ही यादी जाहीर झाली की, तेथे शिक्षण सेवा करणार्‍या गुरुजींची बदली प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अर्थात, या यादीमुळे येथील संबंधित शिक्षकांना बदलीत नवी गावे मिळणार असली तरी त्यांच्या जागी नियुक्ती मिळणार्‍या संभाव्य गुरुजींमध्ये अस्वस्थता वाढणार आहे.
नक्षलग्रस्त अथवा पेसा गाव क्षेत्रात असणार्‍या प्राथमिक शाळा, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2 हजार मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारी गावे, हिस्त्र वन्य प्राणी उपद्रव असणारा जंगल प्रदेश, वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारी गावे तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव, रस्त्याने न जोडलेल्या शाळा (बस, रेल्वे आणि अन्य सार्वजनिक वाहतूक), संवाद छायेचा प्रदेश (बीएसएनएलचा अहवालानुसार), डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाचा शासन निर्णय) राष्ट्रीय, राज्य मार्गापासून दहा किलो मीटरपेक्षा जास्त दूर असणार्‍या गावातील शाळांचा समावेश अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये होतो. या अटी पूर्ण करणार्‍या गावांची सार्वजनिक बांधकाम (राज्य सरकार) यांच्यासह वन विभाग, महसूल विभाग, बीएसएन विभाग यांच्याकडील अहवालानुसार यादी घेवून त्यांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात येतो. यासाठी जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून त्यात उपजिल्हाधिकारी-निवडणूक, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग नियंत्रक-एसटी विभाग आणि शिक्षणाधिकारी हे सदस्य असतात.

बदल्यांचे होणार नियोजन
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक असणार्‍या अवघड क्षेत्रातील शाळांची निवड आता अंतिम टप्प्यात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या समितीने अवघड क्षेत्रातील निवडीची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून पुढील आठवड्यात जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी जाहीर होण्याची शक्यता जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. नगर जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्रातील शाळांची निवड अंतिम केल्यानंतर व पुढील आठवड्यात अवघड क्षेत्रातील शाळांची घोषणा करण्यात आल्यानंतर या अवघड क्षेत्रातील शाळेत तीन वर्षे सेवा देणार्‍या प्राथमिक शिक्षकांचा प्राधान्याने बदली प्रक्रियेत सहभाग घेवून बदली करून घेता येणार आहे. मात्र, त्यांच्या जागी जाण्यासाठी कोणी स्वतःहून इच्छुक नसेल तर मग प्रशासनालाच सक्तीने काही शिक्षकांना अशा शाळांवर पाठवावे लागणार आहे. कारण, तेथील मुलांचे शिक्षण सुरू राहणे महत्त्वाचे असून, त्यासाठी प्रशासनालाच दक्षता घ्यावी लागणार आहे.

सुमारे 300 गावांचा सामावेश
जिल्ह्यातील सुमारे 275 ते 300 गावांचा अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. यासाठी विविध विभागाकडील अहवाल, बीएसएनएल विभागाकडील संवाद छायेच्या प्रदेशाची यादी यांचा आधार घेवून अवघड क्षेत्रातील गावांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, एकदा अवघड क्षेत्रात निवड झालेल्या गावांचे दर 3 वर्षांनी पुनर्विलोकन करण्यात येते व आवश्यक सुविधा झालेली गावे या यादीतून वगळण्यात येतात.

COMMENTS