Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड पालिका अनुकंप प्रतिक्षा यादीतील कर्मचार्‍यांची नियुक्तीची प्रतिक्षा संपली

कराड / प्रतिनिधी : कराड येथील नगरपालिकेच्या अनुकंपा प्रतिक्षा यादीतील कर्मचार्‍यांची नियुक्तीची प्रतिक्षा अखेर संपली. तब्बल 18 वर्षानंतर अनुकंपा

इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची हमरी-तुमरी
नेमबाजीत साईराज काटेला दोन पदके
कृष्णा विश्‍व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

कराड / प्रतिनिधी : कराड येथील नगरपालिकेच्या अनुकंपा प्रतिक्षा यादीतील कर्मचार्‍यांची नियुक्तीची प्रतिक्षा अखेर संपली. तब्बल 18 वर्षानंतर अनुकंपा तत्वावरील कर्मचार्‍यांचा प्रश्‍न मार्गी लागला. त्यामुळे त्यासाठी सुरू असलेले बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आले. त्यासाठी लोकशाही आघाडीने पाठपुराव्यासह केलेल्या मध्यस्थीमुळे प्रश्‍न मार्गा लागला. लोकाशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, जयंत बेडेकर यांच्या हस्ते सरबत घेवून कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील, जयंत पाटील, सौरभ पाटील यांनी पुढाकार घेवून प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल कर्मचार्‍यांची त्यांचे आभार मानले.
जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांनी 25 फेब्रुवारी 2021 च्या पत्रान्वये शासन निर्णयानुसार उचित कार्यवाही करण्यास मंजूरी दिली. त्यानुसार फलटण, महाबळेश्‍वर, पाचगणी, म्हसवड पालिकेतील कर्मचार्‍यांची 31 मार्च 2022 रोजी सातारा येथे ऑर्डर देण्यात आली. मात्र, कराडमधील अनुकंपा तत्वारील कर्मचार्‍यांची ऑर्डर अद्याप काढली नाही. 15 ते 18 वर्षापासून अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळेल याच अपेक्षेने कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, तरीही त्यांचे काम मार्गी लागले नाही. याबाबत त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, लोकशाहीचे नेते सुभाष पाटील यांच्याकडे पाठपुरावा केलाय नियुक्तीला विलंबामुळे कर्मचार्‍यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.
तीन दिवसात काही निर्णय घेवून ऑर्डर दिली नाही तर 14 एप्रिलला सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, आज तो प्रश्‍न निकाली काढला आहे. त्यासाठी लोकशाही आघाडीच्या सौरभ पाटील मुख्याधिकारी डाके यांनी समन्वयातून तोडगा काढला आहे. आत्तापर्यंत निवृत्त झालेल्यांच्या जागी नियुक्ती होईल. अनुकंपावरील 35 पैकी किमान 22 कर्मचार्‍यांना तसे आदेश सोमवारी देण्यात येतील. त्याची कायदेशीर पुर्तता करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती डाके यांनी दिली.

COMMENTS