Homeताज्या बातम्यादेश

34 हजार कोटींचा घोटाळाप्रकरणी वाधवानला अटक

नवी दिल्ली : 34 हजार कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई करत दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) माजी संचालक धीर

मोर्चानंतर ‘आळंदी बंद’चा निर्णय अखेर मागे
Shrirampur : शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Video)
अविवाहित महिलांना गर्भपातापासून दूर ठेवणे असंवैधानिक

नवी दिल्ली : 34 हजार कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई करत दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) माजी संचालक धीरज वाधवान यांना ताब्यात घेतले आहे. धीरज वाधवानला अटक करत दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआयने डीएचएफएलचे माजी संचालक धीरज वाधवान यांना सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. 34,000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून त्यांना दिल्लीतील विशेष कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (13 मे) रात्री धीरज वाधवानला मुंबईतून अटक करण्यात आली. यानंतर मंगळवारी दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने 2022 मध्येच या खटल्याच्या संदर्भात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती, मात्र वाधवान सध्या जामीनावर बाहेर होते. 17 बँकांच्या समुहाला तब्बल 34 हजार कोटीहून अधिक रक्कमेला गंडा घातल्याप्रकरणी तपास यंत्रणेने जून 2022 मध्ये गुन्हा दाखल केला होता. या 17 बँकांच्या समुहाचे नेतृत्व युनियन बँक ऑफ इंडियाकडे होते. बँकांच्या तक्रारीवरून वाधवान व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींनी 2010 ते 2018 या 8 वर्षात डीएचएफएलला 42,781 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. आरोपपत्रात म्हटले होते की, कपिल आणि धीरज वाधवान आणि इतरांनी मिळून हेराफेरी केली. त्यांनी मे 2019 पासून कर्जाचं पेमेंट डिफॉल्ट करून 34,615 कोटींची फसवणूक केली.

COMMENTS