Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान

पाचवा टप्प्यात 13 मतदारसंघात 264 उमेदवार

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होत असून, महाराष्ट्रातील मतदानासाठीचा हा शेवटचा टप्पा आहे. महाराष्ट

…तर, महाराष्ट्रातही मणिपुरसारखे घडेल
एका वर्षात तब्बल 8 हजार श्रीमंतांनी सोडला देश
प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेसची जोरदार निदर्शने

मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवारी मतदान होत असून, महाराष्ट्रातील मतदानासाठीचा हा शेवटचा टप्पा आहे. महाराष्ट्रात 13 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असून, यामध्ये मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र या कालावधीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचारसभांचा चांगलाच धडाका लावला होता, आरोप-प्रत्यारोपांच्या फैर्‍यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले होते. 13 लोकसभा मतदासंघात तब्बल 264 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांचे भवितव्य सोमवारी मतदानयंत्रात बंद होणार आहे. महाराष्ट्रातील 16 मतदारसंघामध्ये मुंबईतील सहा तसेच ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, पालघर, धुळे या मतदारसंघाचा समावेश आहे. या 16 मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळत असून, या निर्णायक लढतीत कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा याचा कौल 4 जूनला कळणार आहे. मात्र या निवडणुकीत 3 केंद्रीय मंत्र्यांसह 7 विद्यमान खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हे सर्वच मतदारसंघ महत्त्वाचे असले तरी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी, विरोधकांनी मुंबई आणि परिसरावर लक्ष केंद्रित केले होते. निवडणूक आयोगाने यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 20 मे रोजी शेवटचा टप्पा आहे.

शेवटच्या टप्प्यातल्या मतदानात, मुंबईकडे खास नजरा लागल्या आहेत. कारण शेवटच्या टप्प्यातली लढाई उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आहे. मुंबईतल्या 6 जागांसाठी, महायुती आणि महाविकास आघाडीत काट्याची टक्कर आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशीही उद्धव ठाकरेंनी विक्रोळी, अंधेरीत सभा आणि रोड शो करत शाखांनाही भेटी घेतल्या. ठाकरेंनी प्रचार थांबेपर्यंत मुंबईत 4 सभा घेतल्या आणि राज ठाकरेंचा समाचार घेतला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला..शुक्रवारी मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कात एकाच मंचावर होते. त्यावरुन एक ठाकरे भाड्याने घेतला, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली होती. त्यामुळे भविष्यातील राजकारण कसे असेल याची कल्पना या निवडणुकीवरून येतांना दिसून येत आहे.

13 मतदारसंघांतील महत्त्वाच्या लढती –
उत्तर मुंबई ः पीयूष गोयल विरूद्ध भूषण पाटील
उत्तर मध्य मुंबई ः उज्ज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड
उत्तर पूर्व मुंबई ः मिहिर कोटेचा विरूद्ध संजय पाटील
उत्तर पश्‍चिम मुंबई ः रवींद्र वायकर विरूद्ध अमोल कीर्तिकर
दक्षिण मुंबई ः यामिनी जाधव विरूद्ध अरविंद सावंत
दक्षिण मध्य मुंबई ः राहुल शेवाळे विरूद्ध अनिल देसाई
कल्याण ः श्रीकांत शिंदे विरूद्ध वैशाली दरेकर
ठाणे ः नरेश म्हस्के विरूद्ध राजन विचारे
दिंडोरी ः भारती पवार विरूद्ध भास्कर भगरे
नाशिक ः हेमंत गोडसे विरूद्ध राजाभाऊ वाजे
पालघर ः हेमंत सावरा विरूद्ध भारती कामडी
भिवंडी ः कपिल पाटील विरूद्ध सुरेश म्हात्रे
धुळे ः सुभाष भामरे विरूद्ध शोभा बच्छाव

COMMENTS