Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या  मतदानाला  सुरूवात 

अमरावती प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील होऊ घातलेल्या 12 कृषी उत्पन्न बाजार समित्या पैकी आज पहिल्या टप्प्यात सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नि

राजीनामा अन् कार्यकर्त्यांचा हुंदका
सावंतवाडीत आठवड्यापासून बिबट्याचा मुक्काम
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शहरातून काढण्यात आली शोभायात्रा 

अमरावती प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यातील होऊ घातलेल्या 12 कृषी उत्पन्न बाजार समित्या पैकी आज पहिल्या टप्प्यात सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सकाळी 8  वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये अमरावती-भातकुली,नांदगाव खंडेश्वर ,चांदुर रेल्वे, धामणगाव, तीवसा मोर्शी अशा पहिल्या टप्प्यात सहा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक आज होत आहे. या निवडणूक रिंगणात 12 बाजार समिती यांच्या 216 संचालक पदासाठी 430 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 30 तारखेला होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सहकारातील सत्तेसाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये फाटा फूट झाली असल्याचा दिसून आलं. अनेक पक्षांनी एकमेकांसोबत हात मिळवणी केली ,कुठे भाजपने काँग्रेस सोबत, तर कुठे राष्ट्रवादीने भाजपसोबत हात मिळवनि केल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात दिसून आले. तर काही ठिकाणी महाविकास आघाडी फाटा फूट सुद्धा दिसून आली आहे.

COMMENTS