Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बुलढाण्यात बाजार समित्यांसाठी मतदानाला सुरुवात

मविआ विरुद्ध भाजप - शिवसेनेत संघर्ष

बुलढाणा प्रतिनिधी - जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. यातील 5 बाजार समित्यांसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सकाळी 8 वाजता सुरुवात झा

जयभिम महोत्सवात थिरकणार नृत्य पावले !
फलटण नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
नटराज मंदिर परिसरातील हत्येचा उलगडा .

बुलढाणा प्रतिनिधी – जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. यातील 5 बाजार समित्यांसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. त्यानंतर सायंकाळीच निवडणुकीचे निकाल स्पष्ट होणार आहे. परिणामी सहकारातील राजकारण सध्या चांगलेच गाजत असल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांची निवडणूक होत असली तरी आज बुलढाणा, देऊळगाव राजा, मेहकर, खामगाव आणि मलकापूर बाजार समित्यांची प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. यातील बुलढाणा बाजार समितीची निवडणूक ही 7 वर्षांनंतर होत आहे. 1594 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात राज्यातील सत्तांतरानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय ध्रुवीकरणही बाजार समितीच्या निवडणुकीत पाहावयास मिळत आहे. प्रामुख्याने बाजार समित्यांमध्ये उभय बाजूमध्येच खरी लढत होत आहे. आता मतदानानंतर नेमका निकाल काय लागतो ? याकडेही लक्ष लागले आहे.

COMMENTS