Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रम सुरु

सातारा / प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि

महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील विद्युत सहाय्यकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
कराड तालुक्यातून दोन वर्षांमध्ये 116 गुंड हद्दपार
देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत

सातारा / प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 22 या कालावधीत आयोजित केला आहे.
या उपक्रमानुसार एकत्रीकृत प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी बुधवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी. दावे आणि हरकती स्वीकरण्याचा कालावधी दि. 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर, मतदार नोंदणीसाठीची चार विशेष शिबिरे शनिवार, दि. 19 नोव्हेंबर आणि रविवार, दि. 20 नोव्हेंबर तसेच शनिवार, दि. 3 डिसेंबर आणि रविवार, दि. 4 डिसेंबर. ग्रामसभा-मतदार यादी वाचन व नोंदणी गुरुवार, दि. 10 नोव्हेंबर, विद्यार्थी, दिव्यांग, महिला यांसाठी विशेष शिबिरे शनिवार, दि. 12 व रविवार, दि. 13 नोव्हेंबर. तृतीयपंथी, देह व्यवसाय करणार्‍या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती या लक्षित घटकांसाठी विशेष शिबिरे शनिवार, दि. 26 व रविवार, दि. 27 नोव्हेंबर. दावे आणि हरकती निकालात काढण्याचा कालावधी सोमवार, दि. 26 डिसेंबरपर्यंत. गुरुवार, दि. 5 जानेवारी अंतिम मतदार यादी प्रसिध्दीची असेल.
नाव नोंदवताना वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म तारखेची नोंद असलेली पाचवी, आठवी, दहावी, बारावी यौपकी एक इयत्तेची गुणपत्रिका, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, आधार कार्ड. निवासाच्या पुराव्यासाठी बँक/किसान/टपाल यांचे पासबुक, रेशनकार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, अलीकडील भाडेकरार, घर नोंदणीकृत विक्री करार, भटक्या विमुक्त जमातीसाठी स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड, महसूल खात्याकडील जमीन मालकी दर्शविणारी कागदपत्रे, नोंदणीकृत भाडे करार, पाणी बील/लाईट बील/ गॅस कनेक्शन इ. याचा वापर करावा.

COMMENTS