Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांची मतदार जनजागृती रॅली 

चांदवड प्रतिनिधी - तालुक्यातील गंगावे येथील श्री संत जनार्धन स्वामी विद्यालयात सोमवार दि.८ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक कार्यालय व स्वीप अंतर्गत ये

विकासरत्न पुरस्काराने श्वेता घाडगे यांचा सन्मान
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला रिपाइंने दिले समर्थन
केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सावटाखाली देशभर ड्र्ग्जचा व्यापार सुरू आहे – अतुल लोंढे (Video)

चांदवड प्रतिनिधी – तालुक्यातील गंगावे येथील श्री संत जनार्धन स्वामी विद्यालयात सोमवार दि.८ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक कार्यालय व स्वीप अंतर्गत येणाऱ्या मोहिमे अंतर्गत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामसेवक व जिल्हा परिषद शिक्षक यांनी जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मतदार जनजागृती पर रॅली काढली. या रॅली दरम्यान गावातील नागरिकांना एकत्रित करत मतदानाचे महत्व पटवून मानवी साखळी निर्माण करण्याचे काम केले.

सदर रॅली ही प्राथमिक शाळा , ग्रामपंचायत कार्यालय आणि शेवटी  संत जनार्दन स्वामी विद्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. या प्रसंगी सेक्टर ऑफिसर डी. एम.निकम , जि. प.शाळेचे मुख्याध्यापक पगार सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.के.सोनवणे,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक,अंगणवाडी कर्मचारी,सर्व विद्यार्थी, ग्रामसेवक अजबराव निकम , ग्रामपंचायत कर्मचारी ,  गावातील भजनी मंडळ, विद्यालयाचे लेझीम पथक उपस्थित होते.शेवटी सर्वांना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच मतदार जनजागृती व्हावी यासाठी स्वीप अंतर्गत विद्यालयात रांगोळी,चित्रकला,निबंध,मेहंदी,प्रतिज्ञा,घोषवाक्य इत्यादी उपक्रमही राबविण्यात आले.

COMMENTS