Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवजीवन विधी महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

नाशिक : जिल्हा स्वीप समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच भाग म्हणून शहरातील नवजीवन विधी महाव

सक्षमांनी किमान दोघांचे मार्गदर्शकत्व स्वीकारावे – उपमुख्यमंत्री फडणवीस
बदलापूर अत्याचारग्रस्त बालिकांना न्याय द्या
आरोग्य विभागाचा 3200 कोटींचा घोटाळा ?

नाशिक : जिल्हा स्वीप समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाच भाग म्हणून शहरातील नवजीवन विधी महाविद्यालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. प्रत्येक मतदाराचे मत हे महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. 

पुढे त्या म्हणाल्या प्रत्येक पाच वर्षांनी आपल्याला लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपला हक्क बजावण्याची संधी येते त्यामुळे मतदान करून आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रत्येक विद्यार्थ्याने मतदानाचे कर्तव्य बजावावे यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन हे महाविद्यालयात करण्यात आले आहे असे प्रतिपादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वोटर हेल्पलाइन ॲप बद्दल माहिती दिली. नवजीवन महाविद्यालयाच्या व्यवस्थापन सदस्य प्रा.मंगला पवार यांनी मतदार नोंदणी व मतदार जनजागृती साठी नवजीवन महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी सुरज निकम याचा सत्कार करण्यात आला. 

महाविद्यालयातील सानिका गिलबिले या विद्यार्थिनीने माझी मतदार नोंदणी अद्याप झालेली नव्हती या कार्यक्रमामुळे मी आजच माझी मतदार नोंदणी करणार असल्याचे सांगितले, विद्यार्थी गौरव गाजरे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार शपथ देऊन मतदार नोंदणी केल्यानंतर मतदार मतदान कार्ड हे शासनाच्या वतीने त्वरित मिळावे अशी विनंती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉईंटवर फोटो काढून आम्ही मतदान करू असा निर्धार व्यक्त केला, नवजीवन महाविद्यालयातील नोडल अधिकारी प्राध्यापक डॉ.समीर चव्हाण यांनी यावेळी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

COMMENTS